महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोशल मीडियावर प्राप्त होणारी ‘फॉरवर्ड’ माहिती तपासून घेण्याचे आवाहन

11:53 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित, यूएस स्थित डिजिटल मीडिया तज्ञ, श्रीनिवासन यांनी सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांना सतत ‘तथ्य-तपासणी’ (पॅक्ट चेक) करावी. विशेषत: सोशल मीडियावर प्राप्त होणारी ‘फॉरवर्ड’ माहिती तपासून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बुधवारी इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे ‘सोशल आणि डिजिटल मीडिया टेंड 2024-काय जाणून घ्यायचे आणि काय वगळले पाहिजे या विषयावर ते बोलत होते. यावेळी श्रीनिवासन यांनी खोट्या बातम्या आणि बनावट व्हिडिओंच्या प्रसारावर नाराजी व्यक्त केली. पुढील वषी भारतात आणि जगातील अनेक भागांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ‘फॉरवर्ड’ करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वर्तमान आणि भविष्यासाठी एक व्यासपीठ म्हणून यु ट्यूब (भ्दल्ऊल्ंा ) प्लॅटफॉर्म चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. संक्षिप्ततेचे समर्थन करताना श्रीनिवासन म्हणाले, जर तुम्हाला व्यापक प्रेक्षकांना आकर्षित करण्याची आवश्यकता असेल तर एखाद्याची कथा सांगताना विशिष्ट आणि अचूक असणे चांगले आहे. सोशल मीडिया हे क्षण पॅप्चर करण्याविषयी, विश्वास, नातेसंबंध, औदार्य आणि लोकांबद्दल आहे. ‘अनुयायी’ ( फॉलोअर) च्या सिद्धांताचा खंडन करताना, श्रीनिवासन म्हणाले की केवळ संख्या ही दिशाभूल करणारी मापदंड होती आणि बहुतेकदा ती चुकीची असते. अनुयायींची संख्या जास्त आहे म्हणून कंटेंट निर्मात्याकडे उच्च दर्जाची सामग्री आहे असे नसते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article