पाणी पिताच मरून जाणारा प्राणी
तप्त वाळवंटातही लागत नाही तहान
जल जीवनाचा आधार आहे. पाण्याशिवाय कुठल्याही जीवाचे अस्तित्व अशक्य आहे. परंतु एक प्राणी पाण्याशिवाय आयुष्यभर राहू शकतो. हा प्राणी कधीच पाणी पित नाही तरीही तो वाळवंटात जिवंत राहू शकतो. या प्राण्याने चुकून पाणी पिले तर त्याचा त्वरित मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते.
जगात उंदराची एक अशी प्रजाती आहे, जी पाण्याशिवाय जगू शकते. ही प्रजाती उत्तर अमेरिकेच्या वाळवंटात आढळून येते. याला कांगारू उंदिर या नावाने ओळखले जाते. हा जगातील एकमेव असा प्राणी आहे, जो पाण्याशिवाय जगू शकतो. याचे पाय अन् शेपूट हे कांगारूसारखे दिसत असल्याने याला कांगारू रॅट म्हटले जाते. याच्या गालांबाहेर कांगारूंप्रमाणेच थैली असते. पाहण्यास देखील हा छोटा कांगारूच वाटतो. कांगारूंप्रमाणे उडी घेण्यासही हा उंदिर तरबेज आहे. हा उंदिर एक सेकंदात 6 मीटरचे अंतर कापू शकतो.
कांगारू रॅट वाळवंटात आढळतो आणि भले हा पाणी पित नसला तरीही याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी असते. याचमुळे अन्य प्राणी याची शिकार करून स्वत:चे तहान भागवत असतात. याचे पुढील पाय छोटे, डोकं मोठं आणि डोळे छोटे असतात. हा प्राणी कॅक्टसची रोपे, वाळवंटात उगवणाऱ्या रोपांचे मूळ आणि कधीकधी छोटे किडे फस्त करत असतो. वैज्ञानिकांनी या प्राण्यावर संशोधन केले आहे. हा प्राणी बिजांद्वारे प्राप्त मेटाबोलाइज्ड पाण्यावर जिवंत राहत असल्याचे या संशोधनात दिसून आले आहे.