महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हिंडाल्को ब्रिजनजीक 5 लाख 57 हजाराची रक्कम जप्त

01:31 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काकती : हिंडाल्को गेट येथील काकती तपासणी नाक्यावर आचारसंहिता पथकाकडून 5 लाख 57 हजार 100 रोख रक्कम जप्त करण्यात आली. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 16 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. भरारी पथकांद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार विविध मार्गांवर तपासणी नाके निर्माण करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता सांगलीहून येणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कारची काकती नाक्यावर तपासणी करण्यात आली. त्यावेळी 5,57,100 रोख रक्कम मिळाली. या रकमेसंदर्भात कागदपत्रे नसल्याने भरारी पथकाचे दंडाधिकारी, ग्रा. पं. पीडीओ अरुण नाईक यांनी रोकड जप्त केली. पोलीस पथकाचे प्रमुख एपीएमसी पोलीस ठाण्याचे एफएसटी हेड सोलापुरे, मोकाशी, भारत यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article