अमेरिकन महिलेची स्कॉटलंडमध्ये सीक्रेट लाइफ
अमेरिकेतून झाली होती बेपत्ता
टेक्सासची एक बेपत्ता महिला स्कॉटलंडच्या जंगलात एका गुप्त झालेल्या आफ्रिकन समुदायासोबत राहत होती. या महिलेने स्वत:ला या समुदायाच्या प्रमुखाची दासी संबोधिले आहे. तिने स्वत:चा वेषही विचित्र करून घेतला होता. समुदायाचा प्रमुख आणि त्याच्या पत्नीने या महिलेला स्वत:च्या वशमध्ये करून घेतले असून तिला ते नुकसान पोहोचवू शकतात, अशी भीती या महिलेच्या परिवाराला सतावत आहे.
टेक्सासची कौरा टेलर ही एक वर्षीय मुलाची आई आहे. कौरा 25 मे रोजी टेक्सास सोडून 6 महिन्यांच्या पर्यटन व्हिसावर ब्रिटनमध्ये पोहोचली होती. आता ती स्कॉटलंडच्या जंगलात राहणाऱ्या एका स्वयंघोषित कुबाला साम्राज्याच्या राजा-राणीसोबत मिळाली आहे. ती तेथे त्यांची दासी बनून राहत आहे.
टेलर स्वत:ला लेडी सफी संबोधिते आणि कुबाला साम्राज्याचे कथित राजे एथेने आणि राणी नंदीसोबत स्कॉटलंडच्या जेडबर्गमध्ये जंगलात दावा करण्यात आलेल्या एका हिस्स्यात राहत आहे.
कौरा मे महिन्यात बेपत्ता झाली होती. परंतु ती हरवलेली नव्हती. ती एका योजनेसह या लोकांसोबत राहण्यासाठी गेली होती. ती केवळ 21 वर्षांची असून एका मुलाची आई असल्याचे कौराची नातेवाईक वँडोरा स्किनर यांनी सांगितले.
टेलरच्या सीक्रेट लाइफबद्दल ती गायब झाल्यावर कळले. तिने एका सीक्रेट संदेश पाठविला होता, यात स्वत:ला आणि मुलीला टेक्सासबाहेर पडावे लागेल, असे लिहिले होते. कौराचे बालपण अत्यंत सुरक्षित आणि संरक्षित होते, तिचे पालनपोषण चर्चमध्ये झाले होते, आता तिने जे सुरू केले आहे, ती निरर्थक असल्याचे स्किनर यांनी सांगितले.
कुबाला साम्राज्याशी संपर्क
टेलर कथित साम्राज्याशी 2023 मध्ये जोडली गेली होती. ती बहुधा स्वत:च्या हायस्कूलमधील सहकाऱ्याच्या माध्यमातून ‘किंगडम ऑफ कुबाला’च्या फेसबुक पेजशी जोडली गेली. यानंतर टेलरने राजा एथेनेसोबत संभाषण सुरू केले होते. स्वत:ला कुबाला साम्राज्याचा राजा संबोधून घेणारा एथेनेचे खरे नाव कोफी ऑफेह असून तो घानातील एका ओपेरा गायक असून त्याची पत्नी तसेच 7 मुलांची आई जीन गाशो असून तिला आता राणी नंदी नावाने ओळखले जाते. टेलर ही राणी नंदीची दासी म्हणून काम करते, स्वत:सोबत गैरवर्तन करणाऱ्या परिवारामुळे टेक्सासमधून पळाले होते असा दावा टेलरने केला. मी स्वत:चा राजा आणि राणीसोबत आनंदात आहे.s. मी अत्यंत अपमानजनक आणि विषारी परिवारातून पळाले आहे. माझे बालपणापासून लैंगिक शोषण झाले असल्याचे टेलरने म्हटले आहे.
काय आहे कुबाला साम्राज्य
हे राज्य हरवून गेलेल्या हिब्रू समुदायाचा हिस्सा असल्याचा दावा स्वत:ला राणी नंदी म्हणवून घेणाऱ्या जीन गाशोने केला आहे. 400 वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांकडून हिरावून घेण्यात आलेली भूमी पुन्हा मिळविण्यासाठी आम्ही स्कॉटलंडमध्ये आलो. महाराणी एलिझाबेथ प्रथम यांनी स्कॉटलंड आणि इंग्लंडमधून सर्व अश्वेत लोकांना निर्वासित केले होते, असा दावा जीन गाशोने केला आहे.