For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायुसेनेच्या विमानाचे चिपी विमानतळावर लॅन्डिंग

09:52 PM Nov 16, 2023 IST | अनुजा कुडतरकर
वायुसेनेच्या विमानाचे चिपी विमानतळावर लॅन्डिंग
Advertisement

परूळे/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर गुरूवारी सकाळी 11 वाजता एक विमान लॅन्डिंग झाले, त्या विमानाने सायंकाळी 5 वा.च्या सुमारास चिपी विमानतळाच्या धावपट्टीवरून टेकऑफ घेत विमानतळावर एक घिरटी घातली, त्यानंतर ते विमान खोल समुद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. काही वेळातच परत ते विमान माघारी येत विमानतळाच्या धावपट्टीवर काही वेळ स्थिरावत गोव्याच्या दिशेने रवाना झाले. हे विमान वायुसेनेचे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या पार्श्वभुमीवर चिपी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी तसेच नाईट लॅन्डिंग यंत्रणेची टेस्टींग घेण्यासाठी ते विमान आले असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी मालवण येथील किल्यावर नौसेना दिन साजरा होणार आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, या प्रमुख व्यक्तींसह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहेत. त्यासाठी चिपी विमानतळावरील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असुन नाईट लॅन्डिंग सुविधाही बसविण्यात आली आहे. परिणामी रात्रीची विमाने लँन्डिंग होणे व टेकऑफ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी डिजीसीएची परवानगी मिळणे क्रमप्राप्त आहे. डिजीसीएचे पथक लवकरच चिपी विमानतळावरील नाईट लॅन्डिंग सुविधेची पाहणी करून ग्रिन सिग्नल देणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात नाईट लँन्डिंग विमानसेवा सुरू होईल. त्या पार्श्वभुमीवरच वायुसेनेच्या विमानाने गुरूवारी चिपी विमानतळाच्या रेन-वेची हवाई पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत चिपी विमानतळाच्या यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होवू शकला नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.