अम्युजमेंट फनफेअर प्रदर्शन आता 26 मे पर्यंतच
बेळगाव
कॅम्प येथील सीपीएड मैदानावर सुरू असलेल्या अम्युजमेंट बटरफ्लाय व रोबोटिक अॅनिमल प्रदर्शनास हजारो बेळगावकरांनी सहकुटुंब भेट देऊन प्रदर्शनाचा आनंद लुटला. ग्राहकांची गर्दी असली तरीही हे प्रदर्शन आता रविवार दि. 26 मे पर्यंतच राहणार आहे. सायमन एक्झिबिटर्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे आबालवृद्धांचे मनोरंजन होत आहे.
या प्रदर्शनातील रोबोटिक अॅनिमल किंगडम पार्क, सिंगापूर टॉवर्स आणि सेल्फी पार्क ही विशेष आकर्षणे ठरली आहेत. अनेक स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात ग्राहकोपयोगी वस्तू, फॅन्सी टॉईज व विविध प्रदेशातून आलेल्या अनेक ऊचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात आले असून प्रख्यात कंपनीची लेदर प्रॉडक्ट्स व हँडवर्क प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीचे मनोरंजन करणारे अनेक गेम्स हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
शिमोगा, म्हैसूर, बेंगळूर, दावणगिरी, मंगळूर या कर्नाटकातील विविध शहरात यशस्वीरीत्या आयोजन करून हे प्रदर्शन बेळगावात मनोरंनाबरोबरच नवनवीन वस्तु खरेदीची संधी देत आहे. आजवर कधीही पाहिली नाहीत अशी रोबोटिक फुलपांखरे वैशिष्ट्यापूर्ण आहेत. कर्नाटक राज्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ठिकाणी ‘कर्नाटका संभ्रम 50’ नावे राज्यातील क्रिकेट खेळाडू, आजवर झालेले मुख्यमंत्री, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अशा व इतर अनेकांचे फोटो प्रदर्शित करण्यात आले आहेत. रोज सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊपर्यंत हे अम्युजमेंट पार्क जापनीज टेन्टमध्ये सुरू असल्याने पावसाचीही भीती नाही. आता फक्त थोडेच दिवस असलेल्या या प्रदर्शनाचा बेळगावकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.