For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन क्रिकेट संघाचे ‘अमूल’ पुरस्कर्ते

06:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन क्रिकेट संघाचे ‘अमूल’ पुरस्कर्ते
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

जून महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या यजमान अमेरिकन क्रिकेट संघाला भारतीय दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील नावाजलेल्या अमूल उद्योग समूह पुरस्कर्ते म्हणून लाभले आहेत. अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने सदर स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सलामीचा सामना 1 जून रोजी खेळविला जाणार आहे. भारतीय दुग्ध व्यवसाय क्षेत्रामध्ये दर्जेदार उत्पादनाने नावाजलेल्या अमूल समूहाचे अमेरिकन संघाला पुरस्कर्ते लाभत आहेत. आता अमेरिकेत अमूल दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अलिकडेच झालेल्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकेत अमेरिकेने कॅनडाचा 4-0 असा पराभव केला होता. अमूल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जयन मेहता यांनी अमेरिकन संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.