महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमृतपालचा साथीदारही लढविणार निवडणूक

06:32 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खलिस्तानी दहशतवादी सध्या तुरुंगात

Advertisement

वृत्तसंस्था/ लुधियाना

Advertisement

खलिस्तानी दहशतवादी आणि वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह हा पंजाबच्या खडूरसाहिब मतदारसंघातून विजयी होत खासदार झाला आहे. आता तुरुंगातील त्याचा सहकारी भगवंत सिंह उर्फ प्रधानमंत्री बाजेके देखील निवडणूक लढविणार आहे. यासंबंधीची घोषण त्याचा पुत्र आकाशदीप सिंहने केली आहे.

बाजेके अमृतपालसोबत आसामच्या डिब्रूढ तुरुंगात कैद आहे. बाजेके हा गिद्दडबाडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी गिद्दडबाडा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वडिंग हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. यामुळे गिद्दडबाडा येथे विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे.

बाजेके हा शेतकरी आंदोलनाही अत्यंत सक्रीय राहिला होता. शेतकरी आंदोलनाचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करायचा. एनएसए अंतर्गत अमृतपालसोबत बाजेके यालाही अटक करण्यात आली आहे. बाजेके हा मोगा येथील धर्मकोट गावचा रहिवासी आहे.

पंजाबमधील राजकारण तापले

काँग्रेस नेते अमरिंदर सिंह वडिंग हे गिद्दडबाडाचे आमदार होते. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत बाजेके उमेदवार राहणार असल्याने पंजाबचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तर दुसरीकडे आसाममधील तुरुंगात कैद असलेल्या अमृतपालने खडूरसाहिब लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला. तसेच इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा पुत्र सरबजीत सिंह खालसाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवत संसदेत प्रवेश केला आहे.

लोकप्रिय होण्यासाठी नामकरण

भगवंत सिंह हा अमृतपालच्या संपर्कात आल्यावर हिंसक कारवाया करू लागल होता. तो स्वत:सोबत  रायफल आणि तलवार बाळगत होता. अमृतपालच्या प्रत्येक कार्यक्रमात तो दिसून यायचा. सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी त्याने स्वत:चे नाव प्रधानमंत्री ठेवले हेते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article