महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुचंडी मराठी शाळेच्या अमृतमहोत्सवाला प्रारंभ

10:33 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पारंपरिक पोशाखामध्ये घोड्यावर स्वार विद्यार्थी-विद्यार्थिनीकडे लक्ष : अमृतमहोत्सव सोहळ्याचे आज उद्घाटन : उद्या सांगता

Advertisement

वार्ताहर /सांबरा
Advertisement

मुचंडी (ता. बेळगाव ) येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला शुक्रवारी लक्षवेधी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. प्रारंभी लक्ष्मण मल्लाप्पा भंगारी यांनी पालखीचे पूजन केले. ग्रंथदिंडीचे उद्घाटन हभप परशराम कणगुटकर महाराज सोनोली यांनी पूजन करून केले. त्यानंतर ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ वेगवेगळे पारंपरिक पोशाख परिधान करून विद्यार्थीवर्ग सहभागी झाला होता. पारंपरिक पोशाखामध्ये घोड्यावर स्वार झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. लक्षवेधी ग्रंथदिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मराठी प्राथमिक शाळेपासून ग्रंथदिंडीला प्रारंभ केला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ग्रंथदिंडी काढली. ग्रंथदिंडीमध्ये माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आज अमृतमहोत्सवाचे उद्घाटन

शनिवार दि. 9 रोजी सकाळी दहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सव सोहळ्याचा उद्घाटन समारंभ होणार आहे. शिक्षण मंत्री मधु बंगाराप्पा यांच्या हस्ते अमृतमहोत्सव सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. दीपप्रज्वलन पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी करतील. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभानंतर ज्येष्ठ नागरिक व शाळेच्या पहिल्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता हलकर्णी ता. चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागाचे डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे व्याख्यान तर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते सुदर्शन शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

सोहळ्याची जय्यत तयारी  

अलीकडेच येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माजी विद्यार्थी संघटना, अमृतमहोत्सव समिती, एसडीएमसी समिती, ग्रामपंचायत, गावातील सर्व युवक मंडळे व संघ-संस्था एकत्र येऊन अमृतमहोत्सव मोठ्याने साजरा करत आहेत.

रविवारीही भरगच्च कार्यक्रम

रविवार दि. 10 रोजी सकाळी दहा वाजता एसडीएमसी अध्यक्ष परशराम पाखरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अर्जुन चौगुले राहणार आहेत. विभागीय कार्यकारी अभियंता संजीवकुमार हुलकाई हे दीपप्रज्वलन करणार आहेत. सरस्वती प्रतिमा पूजन जयवंत बाळेकुंद्री व कपिल भोसले यांच्या हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन माजी आमदार अनिल बेनके, गणेश पूजन बाळकृष्ण तोपिनकट्टी व कलाप्पा अष्टेकर तर ग्रंथपूजन भरत पाटील व मोहन मोरे करणार आहेत.

आजी-माजी शिक्षकांचा सत्कार

यावेळी ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर आजी-माजी शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात तीन वाजता युवा शाहीर वैष्णवी मंगनाईक व साक्षी गोरल यांच्या शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता देणगीदारांचा सत्कार होईल. 6 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री नऊ वाजता जागर लोक संस्कृतीचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन अमृतमहोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे. माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article