महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुरुसिद्ध महास्वामींचा अमृतमहोत्सवी वाढदिवस

12:17 PM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जेएनएमसीच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात उत्साहात : अनेक मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

बेळगाव : राजकारण, समाजकारण, अर्थकारण व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर येणे हा एक सुंदर योगायोग आहे. माझ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आज हे सर्व मान्यवर एकत्र आल्याचा मला आनंद आहे. समाजाच्या विकासासाठी त्यांनी असेच एकत्र यावे, अशा भावना कारंजी मठाचे पूज्यश्री म. नि. प्र. गुरुसिद्ध महास्वामी यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिनी व्यक्त केल्या. येथील जेएनएमसीच्या आवारातील डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात सोमवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमास जगद्गुरु तोंटदार्य संस्थान मठ, डंबळ-गदगचे डॉ. तोंटद सिद्धरामस्वामी, जगद्गुरु दूरदुंडेश्वर मठ निडसेशीचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर कोरे होते.

Advertisement

गुरुसिद्ध महास्वामी म्हणाले, 1991 मध्ये शिवबसव महास्वामी यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर सिद्धरामेश्वर स्वामींच्या सहकार्याने मी माझ्या धार्मिक व सामाजिक कार्याचा प्रारंभ केला व कारंजी मठाच्या उद्धारासाठी स्वत:ला समर्पित केले. या मठाला ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञ आहे. यापुढेही माझ्या हातून अशीच सेवा घडावी, हीच प्रार्थना मी करत आहे. प्रारंभी प्रार्थना झाली. नयना गिरीगौडर यांनी वचन गायन केले. डॉ. प्रभाकर कोरे, तोंटद सिद्धरामस्वामी, पंचम शिवलिंगेश्वर स्वामी यांच्या हस्ते गुरुसिद्ध महास्वामींचा सत्कार करण्यात आला. याच वेळी खासदार जगदीश शेट्टर, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व अन्य मान्यवरांच्या हस्ते गुरुसिद्ध महास्वामींचा सत्कार करण्यात आला. बसवराज जगजंपी व प्रकाश गिरीमल्लण्णावर लिखित पुस्तकाचे गुरुसिद्ध महास्वामींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर, जगदीश शेट्टर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, कारंजीमठ व नांगनूर स्वामी मठाने तसेच तेथील स्वामींनी जात-पात, पंथ, उच्च-नीच असा भेदभाव न करता नि:स्वार्थीपणे समाजाची सेवा केली व गरजूंना आपल्यापरीने मदत केली. मुख्य म्हणजे आपण केलेल्या मदतीचा गवगवा कोठेच केला नाही. कोणत्याही स्वामींचे कार्य हे समाजाला उपयोगी असते, असे सांगून गुरुसिद्ध महास्वामी यांनी शतायुषी व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. सूत्रसंचालन डॉ. गुरुदेवी हुल्याप्पन्नावरमठ व व्ही. के. पाटील यांनी केले. बसवराज भागोजी यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. जगद्गुरु अल्लमप्रभू महास्वामी, चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, शिवानंद गुरुजी, डॉ. शिवयोगी, माजी आमदार फिरोज सेठ, आमदार राजू सेठ, विधानपरिषदेचे माजी सदस्य व आयोजन समितीचे सचिव महांतेश कवटगीमठ, बसवराज जगजंपी, प्रकाश गिरीयहुल्लन्नावर, माजी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके, रमेश कुडची, शंकरगौडा पाटील, पंचाक्षरी चोण्णद, श्रीकांत कदम, राघवेंद्र कागवाड, चंद्रशेखर बेंबळगी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article