महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमृतांतेहि पैजा जिंके... अभिजात मराठी!

06:08 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यावर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेत मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या पाच भाषांना भारतीय अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. यामुळे गोव्यासह महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र, देशातील तसेच जगभरातील मराठीप्रेमींना झालेला आनंद अवर्णनीय आहे.

Advertisement

‘माझा मराठीचा बोलु कौतुके, परि अमृतांतेहि पैजा ज्ंिांके’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी गौरविलेल्या मराठीला हा दर्जा उशिरा मिळाल्याचे शल्य आहेच, पण राजकीय इच्छाशक्ती असल्यास असाध्य तेही साध्य करता येते, हे मोदीजींनी या निर्णयातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. हा आनंदाचा निर्णय होण्यासाठी यापूर्वी अनेक व्यक्तींनी, संस्थांनी प्रयत्न केले होते. मात्र खऱ्या अर्थाने प्रयत्न योग्य दिशेने सुरु झाले ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यानंतरच. महाराष्ट्र सरकारने 2012 साली प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समिती नियुक्त केली. तेव्हापासून ही समिती आणि फडणवीसांनी केंद्राकडे प्रयत्न सुरु ठेवले होते. समितीने मराठीला अडीज हजार वर्षांपेक्षा अधिक इतिहास असल्याचा सप्रमाण अहवाल सादर केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या भाषातज्ञ समितीने अहवालाची चिकित्सा केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मराठीला अभिजात देण्याचा प्रस्ताव मांडला. शेवटी यंदाच्या नवरात्रोत्सवात सर्व प्रयत्नांना फलस्वरुप प्राप्त झाले. नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला. गोव्यातही आनंद ओसंडून वाहत आहे.

Advertisement

केंद्रात 2004 साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रथा सुरु झाली. तामिळ व संस्कृतला 2005 साली तर 2008 साली तेलगु व कन्नड, 2013 मध्ये मल्ल्याळम तर 2014 मध्ये ओडिया भाषेला हा दर्जा देण्यात आला.

निकषांवर खरी उतरते मराठी

एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय घेते. 1. भाषेचा लिखित नोंद इतिहास अती प्राचीन म्हणजे किमान 1500 ते 2000 वर्षांचा असावा. 2. भाषेतील साहित्य प्राचीन असावे, जे त्या भाषेला वारसा मूल्य प्रदान करते. 3. दुसऱ्या भाषेतून न उचललेली अस्सल साहित्यिक परंपरा असावी. 4. अभिजात भाषा आजच्या भाषेपेक्षा निराळी, शुद्ध असावी. या चार प्रमुख निकषांनुसार कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा दिला जातो. मराठी भाषा या चारही निकषांवर खरी उतरत असल्याने हा दर्जा मिळाला.

मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झाले? या दर्जाचा मराठीला काही फायदा होणार काय? शैक्षणिक, आर्थिक, रोजगारसंधी या क्षेत्रात त्याचा काय परिणाम होईल? याबाबत जाणून घेणेही संयुक्तीक ठरते. हा नुसता नावाचा पुरस्कार, सन्मान, दर्जा नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

  1. या दर्जामुळे मराठीसह तिच्या ज्या बोली आहेत त्यांचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह, साहित्य विस्तार करणे शक्य होणार आहे, त्यासाठी केंद्र सरकारचे अनुदान मिळेल.
  2. भारतातील किमान 450 विद्यापीठांमध्ये मराठीचे शिक्षण उपलब्ध होईल.
  3. प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठीसाठी स्वतंत्र अध्यासन स्थापन करण्यात येईल.

4.मराठीतील प्राचीन ग्रंथांचे अन्य भाषांमध्ये अनुवादन होईल.

  1. मराठीच्या समृद्ध वारशाचा जगाला पुन्हा नव्याने परिचय घडेल.
  2. महाराष्ट्रातील 12 हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी केंद्राकडून निधी मिळेल.

7.देशभरात मराठी शिकविली जाणार असल्याने नव्या भारतीय पिढीत मराठी रुजविली जाईल, मराठीचा देशभर विस्तार होईल.

8.मराठीचे संशोधन, संदर्भ संग्रह, संवर्धन यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार असल्याने तशी पदे निर्माण होऊन रोजगार उपलब्ध होतील.

  1. मराठीतील प्राचीन साहित्याचे डिजिटलायझेशन होणार असल्याने डिजिटल प्रकाशन माध्यमात कौशल्यप्राप्त युवक-युवतींना रोजगार मिळेल.

10.मराठी साहित्याचा सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद होणार असल्याने लक्षणीय संख्येत कुशल अनुवादकांना रोजगार मिळेल.

11.केंद्र सरकारकडून दरवर्षी मराठीसाठी तब्बल 350 कोटींचे विशेष अनुदान मिळणार आहे.

12.मराठी ज्ञानाची भाषा होतीच, आता ती आर्थिक व्यवहाराची संपूर्ण देशाची, जगाची भाषा होईल.

13.मराठीतील दोन भाषातज्ञांना विशेष राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होतील.

14.केंद्रीय स्तरावर मराठीचे सेंटर फॉर एक्सलन्स फॉर स्टडिज स्थापन होईल.

15.आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी प्रभाव वाढून विस्तार होईल.

16.मराठीतील प्राचीन भारतीय आध्यात्मिक, वैचारिक प्रगल्भतेची आधुनिक जगाला ओळख होईल.

17.भारतीय ज्ञान, तत्वज्ञानाचा खरा इतिहास जगासमोर येईल, जे यापूर्वी लपविले गेले होते. एकंदरीत अभिजात दर्जामुळे मराठीचा वेलु गगनावरीच जाईल, हेच खरे!

भाषा, संस्कृती याबाबत काही माणसे भावनिक असतात. कधी कधी त्यांचा हा भावनिकपणा इतरांच्या द्वेशापर्यंत पोहोचतो. आपल्या देशाला वैभवशाली समृद्ध वैचारिकतेची, प्रगल्भतेची परंपरा आहे, आपणच विश्वबंधुत्वाचा संदेश देतो हे विसरुन काहीजणांची मने कोती होतात. त्यातूनच मग आपली भाषा श्रेष्ठ आणि दुसऱ्याची ती कनिष्ठ. आपली ती भाषा, दुसऱ्यांची ती बोली ठरवतो. भाषा ही माणसाच्या विकासासाठीच आहे. मातृभाषेचे आपल्या भाषाज्ञानाचे अधिष्ठान आहे. ती आपणास व्यवस्थित अवगत असल्यास आपण इतर भाषा समजू शकतो. मातृभाषेचा सिद्धांत जगमान्य आहे. त्यामुळेच इतर भाषांचा विकास होतो. मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे इतर भाषा दुय्यम दर्जाच्या नाहीत. त्यामुळे ज्या भाषांना हा दर्जा मिळालेला नाही, त्या भाषांना कोणी हिणवू नये. हा दर्जा मिळाल्याने मराठी साहित्यिकांची, शिक्षकांची, संशोधकांची, अनुवादकांची एकंदरीत मराठीप्रेमींची जबाबदारी वाढली असून या दर्जानुसार निर्माण होणाऱ्या व्यवस्थेत स्वत:चे योगदान देण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे. मराठीच्या, कोकणीच्या बाबतीत भावनिक स्तरावर गळा काढायचा आणि प्रत्यक्ष व्यवहारात मात्र इंग्रजीला कवटाळणे हे सोडावे लागेल. आपल्या स्वत:पासून, आपल्या घरापासून आपल्या भाषेचे, भारतीय संस्कृतीचे जतन होतेय की नाही, हे पहावे लागेल. स्वभाषेचा, स्वसंस्कृतीचा विसर पडल्याने वाईट विचारांचे आचरण झाल्याने भारतीय समाज कोसळू लागला आहे. ही घसरण सावरण्यासाठी आपले भारतीय साहित्य सक्षम आहे. भाषा, साहित्य म्हणजे माणुसकीचा शाश्वत स्रोत आहे. गोव्यात मराठी व कोकणी भाषांतील कटुता नाहीशी व्हायला हवी. कोकणीला ‘बोली’ म्हणून आणि मराठीला ‘भायली’ म्हणून हिणवत राहण्यापेक्षा दोन्ही भाषांचे ज्ञान अवगत करुन हिंदी, संस्कृत, बंगाली, गुजराती आणि अन्य भारतीय भाषांचेही ज्ञान मिळविल्यास आंतरभारती संपन्न होईल. कटुता संपून जाईल. शेवट संत सोहिरोबानाथ म्हणतात तसेच आचरण ठेवुया... अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे!

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article