महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीतील ''जॅकेटवाल्या'' जादूगाराला आता आराम करू द्या

05:09 PM Oct 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

खा . अमोल कोल्हेंनी उडवली मंत्री केसरकरांची खिल्ली

Advertisement

सावंतवाडी

Advertisement

सावंतवाडीत जादूगार फिरतोय ,एक झग्यावाला जादूगार तर दुसरीकडे सावंतवाडीतील जॅकेटवाला जादूगार. सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला केवळ विकासाची आश्वासने देऊन जादू केली जातेय. येथील जनतेने आता विकास होत नसेल तर आमदार बदलायला हवा. असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आज सावंतवाडी येथे लगावला . वारंवार भूमिपूजन होऊन जर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अजून होत नसेल तर आता आमदार बदलायला हवा. आता बदल हवो तर आमदार नवो अशा खास मालवणी भाषेत खा . कोल्हेंनी आमदार बदलाचे आवाहन लोकांना केले . शाळेतील मुलांच्या गणवेशासाठी सतराशे कोटींचे टेंडर मंजूर झाले . १५ ऑगस्ट उजाडून गेला तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही . जर वारंवार एका डॉक्टरकडे जाऊन आजार बरा होत नसेल तर डॉक्टर बदलायचा असतो . तसा येथील जनतेने आता विकास होत नसेल तर आमदार बदलायला हवा अशी टीका खासदार कोल्हेंनी केसरकरांच्या होमपीचवर केली .

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # deepak kesarkar # amol kolhe #
Next Article