महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमिताभ बच्चन यांची अयोध्येत भूखंड खरेदी

06:02 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 हजार चौरस फूट जमिनीची किंमत 14.50 कोटी

Advertisement

► वृत्तसंस्था / अयोध्या

Advertisement

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत भारताचे प्रसिद्ध चित्रपट महानायक अमिताभ बच्चन यांनी भूखंड विकत घेतला आहे. 10 हजार चौरस फुटाच्या या भूखंडाची किंमत 14.50 कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे. त्यांनी हा भूखंड अभिनंदन लोढा या मुंबईस्थित मालमत्ता विकासकाकडून खरेदी केल्याची माहिती आहे.

22 जानेवारी 2024 या दिवशी रामजन्मस्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. त्याआधी अमिताभ बच्चन यांनी या भूखंडाची खरेदी केली आहे. त्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. अयोध्येच्या ‘शरयू’ या भागात हा भूखंड आहे. या भागाचे क्षेत्रफळ 51 एकर इतके असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अयोध्येसंबंधी आस्था आणि प्रेम

अयोध्या ही देवनगरी असून ते प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान आहे. या नगरीसंबंधी आपल्या मनात अतीव आदर, प्रेम आणि आस्था आहे. त्यामुळे तेथे हा भूखंड विकत घेणे हा आपल्यासाठी एक सन्मानाचा विषय आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला, असे वक्तव्य अमिताभ बच्चन यांनी या खरेदीसंबंधी केले.

मंदिरापासून नजीकच

अमिताभ बच्चन यांचा भूखंड राममंदिरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तसेच तो अयोध्येच्या ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळा’पासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. अभिनंदन लोढा हे अयोध्येत आता मोठी गुंतवणूक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भगवान रामलल्लांच्या मंदिरामुळे अयोध्या नगरीचा आता कायापालट होणार असून तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत. परिणामी, त्या स्थानाचे महत्व वाढणार आहे, असे प्रतिपादन लोढा यांनी केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article