For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हापशात आज अमित शहांची सभा

12:02 PM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्हापशात आज अमित शहांची सभा
Advertisement

गुरुवारी दिवसभरात सर्व तयारी पूर्ण : 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार, सर्वत्र कडक बंदोबस्त

Advertisement

म्हापसा : गृहमंत्री अमित शहा यांची आज शुक्रवार दि. 3 मे रोजी सायंकाळी 6 वा. म्हापसा नवीन केटीसी बसस्थानक येथे जाहीर सभा होणार असून या सभेला 25 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुऊवारी दिवसभर वरिष्ठ अधिकारी, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार जोशुआ डिसोझा यांनी सभेस्थळी येऊन पाहणी केली आणि अधिकारीवर्गाला मार्गदर्शन केले. काल गुऊवारी दिवसभर जिल्हा प्रशासन, पोलीस, सुरक्षा यंत्रणा तसेच इतर अधिकारीवर्गाने आपापल्या सेवेतील तयारीचा आढावा घेतला. या तयारीचा आढावा घेताना पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले की, सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तिच्या आढाव्यासाठी खास बैठक झाली. कायदा सुव्यवस्था व इतर बाबतीत सविस्तर चर्चा झाली.

सर्वत्र कडक बंदोबस्त

Advertisement

गोवा पोलीस व सीआरपीएफ, ट्राफिक पोलीस आदींची सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. भाजप युवा मोर्चाचे 300 कार्यकर्ते यावेळी चोख बंदोबस्तासाठी तैनात असतील. गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रात सभा असून ती संपवून ते मोपा विमानतळावर येतील. तेथून म्हापसा सभास्थळी येतील. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.