For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेतील सर्वात दु:खी शहरं

06:12 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेतील सर्वात दु खी शहरं
Advertisement

कर्जात बुडाले आहेत लोक, टिकत नाही विवाह

Advertisement

अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. या देशात सर्वात धनाढ्या लोक राहत असतात. परंतु जसे दिसते तसे नसते असे बोलले जाते. अमेरिकेत काही अशी शहरं आहेत, जेथील लोक दिवसेंदिवस स्वत:च्या आनंदाला मुकत निराशेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अमेरिकेतील सर्वात नाखुश शहरांची यादी समोर आली आहे. यात अशी अनेक शहरे आहेत, जी अर्थव्यवस्थेप्रकरणी खूपच आघाडीवर आहेत, परंतु आनंदाप्रकरणी मागे आहेत.

न्यू ऑरलियन्स, लुइसियाना

Advertisement

एमरिकेतील न्यू ऑरलियन्स, लुइसियाना शहर स्वत:चा इतिहास आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते, परंतु येथील बहुतांश लोकसंख्या नाखुश असल्याचा अहवाल आहे. शहरात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असून तेथे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेथील बेरोजगारी दर 11 टक्के आहे. येथील रहिवासी कर्जात बुडालेले असून येथील लोक आर्थिक समस्येला तोंड देत आहेत.

बाल्टीमोर, मेरीलँड

या शहरातील लोकही नैराश्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. येथे असलेल्या आर्थिक अडचणी, हिंसक अपराधांमुळे लोक मानसिकदृष्ट्या अत्यंत त्रस्त आहेत. येथील लोकांकडे निश्चित रोजगार नाही अशास्थितीत सर्वजण जगण्यासाठी आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी संघर्ष करत आहेत.

मेम्फिस, टेनेसी

अमेरिकेतील मेम्फिसची गणना अशा शहरांमध्ये होते, जेथे दरदिनी गुन्हे वाढत आहेत. लोकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण नेहमीच असते. याचमुळे येथील लोक अत्यंत कमी आनंदी असतात. शहरातील अनेक लोक निराश आहेत, कारण त्यांना स्वत:ची सुरक्षा आणि आर्थिक समस्येची भीती सतावत असते.

बर्मिंघम, अलबामा

बर्मिंघम आणखी एक असे शहर आहे, जेथील लोकांसाठी नाराजीचे कारण घटस्फोट आहे. या शहरात जोडप्यांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. येथील लोकांचा विवाह टिकचत नसल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परंतु या शहरातील लोक नाखुश असण्यामागील कारण वैयक्तिक तणावासोबत गुन्हे आणि खराब आर्थिक स्थिती देखील आहे.

क्लीवलँड, ओहियो

क्लीवलँड या शहरात लोक घटस्फोट, गुन्हे आणि खराब आर्थिक स्थितीमुळे नव्हे तर हवामानामुळे निराश असतात. क्लीवलँडला आव्हानात्मक हवामानाला तोंड द्यावे लागते, जेथे सातत्याने ढग दाटून आलेले असतात आणि पाऊस पडत असतो. यामुळे तेथील लोक नेहमीच पावसाबद्दल वैतागलेले असतात. याचबरोबर येथील गुन्ह्यांचे प्रमाणही अधिक आहे.

Advertisement
Tags :

.