अमेरिकेतील महिलेने मोडला स्वत:चाच विक्रम
गिनिज बुकमध्ये नाव नोंद
एका महिलेने ब्रेस्ट मिल्क डोनेशन करण्याचा विश्वविक्रम केला आहे महिलेने आतापर्यंत शेकडो मुलांना सहाय्य केले आहे. गिनिज बुक ऑफ रिकॉर्डनुसार महिलेने 1,645.58 लिटर दूध दान केले आहे. या महिलेचे नाव एलिस ओगलेट्री आहे. 36 वर्षीय एलिस अमेरिकेच्या टेक्सास येथे राहते. 2014 मध्ये देखील तिने हा विक्रम प्रस्थापित केला होता. तेव्हा तिने 1,569.79 लिटर दूध दान केले होते. 10 वर्षांनंतर ओगलेट्रीने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे. महिलेने नॉर्थ टेक्सास येथील मदर्स बँकला हे दूध दान केले आहे. एक लिटर ब्dरोस्ट मिल्ल्क मुदतपूर्व जन्मलेल्या 11 नवजातांना पोषण पुरवू शकते. अनुमानानुसार एलिसने आतापर्यंत एकूण 3 लाख 50 हजारांहून अधिक तान्हुल्या बाळांची मदत केली आहे.
माझे मन अत्यंत मोठे आहे, अखेर माझ्याकडे पैसे नाहीत. मी चांगल्या कामांसाठी वारंवार पैसे देऊ शकत नाहीत. कारण माझा एक परिवार असून त्याचे पालनपोषण मला करायचे आहे. याचमुळे दूध दान करणे मला योग्य वाटले. 2010 मध्ये मी स्वत:च्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर हे पुण्यकार्य सुरू केले, आता माझा मुलगा 14 वर्षांचा असल्याचे एलिस सांगते. यासंबंधी मला काहीच माहिती नव्हते. माझ्या मुलाच्या जन्मावेळी मला याविषयी समजले. जगभरातील अनेक महिलांना स्वत:च्या तान्हुल्या बाळांचे पोषण करता येत नसल्याची समस्या आहे. एका नर्सने मला दूध दानाविषयी माहिती दिली होती. तेव्हापासून मी याचा विचार करत यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. हे पुण्यकार्य जगातील सर्वात चांगल्या भावनांपैकी एक असल्याचे एलिस सांगते.