महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून

06:17 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जोकोव्हिचचे 25 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सोमवारपासून सुरु होणाऱ्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात कोको गॉफ, इगा स्वायटेक आणि आर्यना साबालेंका प्रमुख आकर्षण ठरत आहेत. तर पुरुषांच्या विभागात सर्बियाच्या जोकोविचचे लक्ष्य 25 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर राहिल. जोकोविच, अल्कारेझ आणि सिनेर यांच्यात जेतेपदासाठी चुरस राहिल.

अमेरिकेची कोको गॉफ ही या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. येथील आर्थर अॅश स्टेडियमवर गॉफ जेतेपद राखण्यासाठीच्या मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ करेल. मात्र पोलंडच्या स्वायटेकला स्पर्धेच्या मानांकनात टॉप सिडींग देण्यात आले असून गेल्या वर्षी या स्पर्धेत साबालेंकाने उपविजेतेपद मिळविले होते. कोको गॉफचा पहिल्या फेरीतील सामना फ्रान्सच्या ग्रेचेव्हाशी होणार आहे. गॉफला स्थानिक शौकिनांकडून साहजिकच अधिक प्रोत्साहन लाभेल. टोरँटो आणि सिनसिनॅटी टेनिस स्पर्धांमध्ये गॉफची कामगिरी समाधानकारक झाली नाही. गेल्या वर्षी गॉफच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसत होते आणि तिने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद या स्पर्धेत मिळविले होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गॉफने आपला सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये साबालेंकाशी मुकाबला करण्याची ताकद निश्चितच गॉफमध्ये दिसत आहे. बेलारुसची साबालेंका यावेळी जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत साबालेंकाने किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. पोलंडच्या इगा स्वायटेककडूनही चमत्कार घडू शकेल.

पुरुषांच्या विभागात जेतेपदासाठी प्रामुख्याने जोकोविच, स्पेनचा अल्कारेझ आणि इटलीचा जेनिक सिनेर यांच्यात चुरस राहिल. दरम्यान जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी तो सज्ज झाला आहे. या स्पर्धेत जोकोविच हा विद्यमान विजेता आहे. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य लढतीत इटलीच्या सिनेरकडून जोकोविचला पराभव पत्करावा लागला होता. तर जुलैमध्ये झालेल्या विम्ब्लडन ग्रँडस्लॅम स्पर्धेत स्पेनच्या अल्कारेझने अंतिम सामन्यात जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे 37 वर्षीय जोकोव्हिचला फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीच्या लढतीतून माघार घ्यावी लागली होती. 14 वर्षापूर्वी जोकोव्हिचने टेनिस क्षेत्रातील या चार ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविला होता आणि त्याला एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती. मात्र अलिकडेच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जोकोविचने स्पेनच्या अल्कारेझचा पराभव करुन सुवर्णपदक मिळविल्याने त्याचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. इटलीचा सिनेर, रशियाचे रुबलेव्ह, मेदव्हेदेव यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहिल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article