महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकन फुटबॉल संघ बाद फेरीच्या समिप

06:30 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/सेंट इटेनी (फ्रान्स)

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेचा पुरूष फुटबॉल संघ इ.स. 2000 नंतर पहिल्यांदाज बाद फेरीच्या समिप पोहोचला आहे.

Advertisement

पुरूषांच्या फुटबॉल या क्रीडा प्रकारातील पहिल्या सामन्यात मोरोक्कोने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात शौकिनांकडून हिंसक घटना घडल्या. या क्रीडा प्रकारात स्पेन आणि जपान या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात अमेरिकेने न्यूझीलंडचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. आता अमेरिकेचा पुढील सामना गिनीयाबरोबर होणार आहे. अ गटात सध्या अमेरिकेचा संघ 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या गटात फ्रान्सचा संघ 6 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. आता फ्रान्स आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बाकी आहे.

अर्जेंटिना ब गटातून आघाडीवर आहे. सरस गोलसरासरीच्या जोरावर अर्जेंटिनाने या गटात युक्रेनला मागे टाकले आहे. अर्जेंटिना आणि युक्रेन यांनी समान 3 गुण घेतले आहेत. या गटातून अर्जेंटिनाने दुसऱ्या सामन्यात इराकचा 3-1 असा पराभव केला होता. अर्जंटिनाला पहिला सामना मोरोक्कोकडून पराभव पत्करावा लागला होता. युक्रेनने मोरोक्कोवर 2-1 अशी मात केली आहे.

क गटात स्पेनचा संघ 6 गुणासह आघाडीवर असून या संघाने बाद फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. इजिप्तचा संघ या गटात 4 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. डॉम्निक प्रजासत्ताक 1 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र या गटात उझ्बेकचे आव्हान संपुष्टात आले आहे.

ड गटात जपानचा संघ 6 गुणासह पहिल्या स्थानावर असून त्यांनी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. जपानने पाठोपाठ दोन सामने जिंकले आहेत. आता प्राथमिक फेरीतील त्यांचा शेवटचा सामना इस्त्रायलबरोबर होणार आहे. या गटात पराग्वे 3 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article