महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकन डॉक्टर भारतीय संस्कृतीच्या प्रेमात

06:01 AM Nov 27, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेच्या एका महिला डॉक्टराला हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीविषयी अतीव आदर आणि प्रेम निर्माण झाल्यामुळे तिने उत्तराखंड येथील एका हिंदू युवकाशी हिदू रितीनुसार विवाह केल्याची घटना घडली आहे. या युवकाचे नाव विकास असे असून तोही सध्या अमेरिकेतच स्थायिक झालेला आहे. अमेरिकन डॉक्टर युवती प्रेंचस्का हिचा त्याच्याबरोबर अमेरिकेतच परिचय झाला. परिचयाचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

विकास हे अमेरिकेत मोठय़ा हॉटेलात व्यवस्थापकाच्या पदावर आहेत. दोघांच्याही घरच्यांची या विवाहाला पूर्ण संमती होती. प्रेंचस्का यांचा हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचा अभ्यास असून त्यामुळे त्यांना या संस्कृतीसंबंधी आदर आहे. यामुळेच त्यांनी हिंदू वैदिक पद्धतीने विवाह करण्याला संमती दिली. त्यानुसार दोन्ही कुटुंबे उत्तराखंड येथील टिहरी येथे आले आणि एका मंदिरात विवाहबद्ध झाले. 16 नोव्हेंबरला हा विवाह समारंभ थाटात पार पडला. विवाहानंतर त्वरित हे जोडपे अमेरिकेला परत गेले. विकास हे टिहरी येथील अलोलसिंग रावत यांचे पुत्र आहेत. ते गेल्या सहा वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article