For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका करणार तैवानला शस्त्रपुरवठा

07:00 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका करणार तैवानला शस्त्रपुरवठा
Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

Advertisement

तैवानसोबतच्या जवळपास दोन अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्रांच्या कराराला अमेरिकेने ग्रीन सिग्नल दिला आहे. अमेरिकेकडून प्रगत शस्त्रास्त्रांच्या वितरणानंतर तैवान एक स्वराज्य बेट म्हणून आणखी मजबूत होणार आहे. त्याचवेळी अमेरिका आणि तैवानमधील या करारानंतर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तैवानच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यासाठी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाइ चिंग यांनी अमेरिकेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तैवानच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी मे महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर चीनकडून मिळणाऱ्या लष्करी धमक्मयांच्या पार्श्वभूमीवर तैवानने आपली सुरक्षा क्षमता वाढवली आहे.

तैवान आणि अमेरिका यांच्यातील या करारात तीन नॅशनल अॅडव्हान्स्ड सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टम (एनएएसएएमएस) समाविष्ट आहेत. शस्त्रपुरवठ्यासंबंधी करण्यात आलेला हा करार अंदाजे 1.16 अब्ज डॉलर्सचा आहे. यासोबतच यात एक रडार सिस्टीम देखील समाविष्ट असून त्याची किंमत सुमारे 828 दशलक्ष डॉलर्स आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या या प्रगत क्षेपणास्त्रांची ताकद युव्रेन युद्धात सिद्ध झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तैवानच्या हवाई संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.