कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘भारतासारखा चांगला मित्र अमेरिकेने गमावला’

06:17 AM Sep 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘टॅरिफ वॉर’दरम्यान तीन बड्या नेत्यांचे छायाचित्र पोस्ट करत ट्रम्प यांचे हताशदायी विधान : रशियासह चीनचाही नामोल्लेख

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

प्रचंड व्यापारी शुल्क लादल्यानंतर कोणताही विरोध न करता येणाऱ्या परिस्थितीशी समर्थपणे सामोरे जाणाऱ्या भारताबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘रशिया आणि भारताशी आपले चांगले संबंध संपत आहेत असे दिसते. भारतासारखा चांगला मित्र अमेरिकेने गमावल्यासारखे आहे’, असे ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टसोबतच ट्रम्प यांनी चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे तीन बडे जागतिक नेते दिसत आहेत.

भारत आणि रशियासोबतचे संबंध संपत आल्याचे दिसू लागले आहेत, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिताना अमेरिकेने भारत आणि रशियाला गमावलंय. हे दोन्ही देश आता चीनच्या जवळ गेले आहेत, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आलेले ट्रम्प यांचे हे विधान  हताशदायी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तर काहींनी हे वक्तव्य भारत आणि रशिया सोबतचे संबंध संपवण्याचे संकेत देत असल्याचे म्हटले आहे.

रशिया आणि भारत हे दोन मोठे देश चीनच्या बाजूने झुकल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्टपणे दिसून आले. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एससीओ’ परिषदेच्या औचित्याने केलेला चीनचा दौरा आणि त्यानंतर तेथे घेतलेली पुतिन यांची भेट निमित्तमात्र ठरलेली दिसते. एकंदरीत अमेरिका आता या दोन्ही देशांसोबतचे संबंध संपवण्याच्या विचारात आहे. ट्रम्प यांच्या पोस्टने याबद्दलचे संकेत मिळाले आहेत. ट्रम्प यांच्या पोस्टवर परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, रशिया, चीन आणि भारताच्या नेत्यांसोबत एकत्र येणे हे अमेरिकेला उत्तर म्हणून पाहिले जात आहे. मोदींनी चीनला जाऊन ट्रम्प यांना कडक संदेश दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकन सरकारने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तर रशियासोबत युक्रेन युद्धामुळे अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला चीनचा दौरा केला. चीन, रशिया आणि भारत अशा मोठ्या देशांचे प्रमुख एससीओच्या बैठकीत एकत्र आल्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याने अमेरिकेची स्थिती चिंताग्रस्त बनली आहे. भारत, रशिया आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांची भेट अमेरिकेला उत्तर देणारी मानली जाते. मोदी यांनी चीन दौरा करून ट्रम्प यांना इशारा दिल्याचे तज्ञ सांगतात. ट्रम्प यांची सोशल मिडिया पोस्ट पाहता त्यांनी मोदी, जिनपिंग आणि पुतिन यांच्या भेटीचा धसका घेतल्याचे दिसते.

अतिरिक्त टॅरिफमुळे तणाव वाढला

ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. या टॅरिफमुळेच भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने भारतावर सुरुवातीला 25 टक्के बेस टॅरिफ लादला. त्यानंतर रशियन तेलाची आयात करत असल्याने 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला गेल्याने एकूण आयातशुल्क 50 टक्क्यांवर गेले. रशियाकडून खनिज तेलाची खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा इशारा दिला होता. 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादत ट्रम्प प्रशासनाने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी भारताने त्यात आडकाठी आणलेली नाही. व्यापारविषयक बोलणी चालू असल्याचे सांगितले जात असले तरी अमेरिकेने कर कमी केलेला नाही. आता भारताने अन्य देशांशी बोलणी करत पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article