अंगणवाडी सेविका, मदतनीस निवृत्ती लाभ योजनेत सुधारणा
पणजी : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना त्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती लाभ योजनेत सुधारणा केली आहे. सुधारित योजनेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या निवृत्तीचे वय 62 वर्षे असेल आणि अंगणवाडी सेविकेसाठी 5 लाख ऊपये तर, मदतनीस यांच्यासाठी 3 लाख ऊपये सरकारने निवृत्तीलाभ जाहीर केला आहे. निवृत्ती लाभ योजनेत सुधारणेनुसार, गोवा सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या निवृत्तीचे वय 1 मे 2024 पासूनच्या कार्यकाळापासून 62 वर्षे करण्यात आलेले असून, जे 60 वर्षांनंतर वैद्यकीय तंदुऊस्तीच्या अधीन असेल. निवृत्त अंगणवाडी सेविकांना आता 5 लाख ऊपयांचा एकरकमी लाभ मिळेल, तर अंगणवाडी सेविकांना 3 लाख ऊपये मिळतील. 25 वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत, समान रक्कम लागू होते. या योजनेत सेवेत असताना मृत्यू झालेल्या प्रकरणांचा देखील समावेश आहे, ज्याचे फायदे नामनिर्देशित व्यक्तीला मिळतील. महिला आणि बाल विकास संचालनालयामार्फत योजना राबविण्यात आली असून त्यानुसार गोवा सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी सुधारित लाभ जाहीर केलेले आहेत.