For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व लोकसेवा फाऊंडेशनला रुग्णवाहिका भेट

10:49 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
सर्व लोकसेवा फाऊंडेशनला रुग्णवाहिका भेट
Advertisement

बेळगाव : हिंदू देवदेवतांचे अपमान टाळण्याबरोबरच रुग्णसेवेच्या कार्यात स्वत:ला गुंतवलेल्या येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या कार्याची दखल घेत बेलसिटी डायग्नोस्टिक सेंटरच्यावतीने एक सुसज्जित रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश बसय्या हिरेमठ यांच्याकडे रुग्णवाहिका सोपविण्यात आली. बेलसिटीने आपल्या फाऊंडेशनला रुग्णवाहिका भेट दिल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गरीब रुग्णांच्या सेवेसाठी आपण सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे वीरेश हिरेमठ यांनी सांगितले. यावेळी डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक निलकंठय्या हिरेमठ शास्त्राr, शरदचंद्र शास्त्राr, भाऊसाब अत्तार, प्रवीण हिरेमठ, नागय्या पुजार, आनंद भातकांडे, गौरीश हिरेमठ आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.