वेस्ट कोस्ट कंपनीकडून किनळे गावाला रुग्णवाहिका प्रदान
सातार्डा -
किनळेत साकारणाऱ्या वेस्ट कोस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून किनळे ग्रामपंचायत कार्यालयाला मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. रुग्णांना सोयीयुक्त मारुती कंपनीची इको रुग्णवाहिका गावाला दिल्याने वेस्ट कोस्ट कंपनीचे मालक तरुण कुमार यांना सरपंच दीपक नाईक व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या रुग्णवाहिकेचा शुभारंभ सरपंच श्री नाईक यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी उपसरपंच शिशिल डिसोजा,ग्रामपंचायत सदस्य मानसी नाईक, प्रेमानंद जोशी, मोनिका डिसोजा, दिव्या कोरगावकर, वासीम नाईक,तंटामुक्त समिती अध्यक्ष यासिन नाईक, पोलीस पाटील इब्राहिम ख्वाजा, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर होडावडेकर, तळवणे आरोग्य उपकेंद्राचे डॉ जेवरे, आरोग्य सेविका श्रीमती जंगम व ग्रामस्थ उपस्थित होते.
वेस्ट कोस्ट कंपनीकडून किनळे गावाला रुग्णवाहिका देण्यात यावी यासाठी सरपंच दीपक नाईक, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर होडावडेकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन वेस्ट कोस्ट कंपनीचे मालक तरुण कुमार यांनी पंचक्रोशीतील रुग्णांच्या सोयीसाठी सुसज्ज नूतन रुग्णवाहिका ग्रामपंचायतला दिली आहे.
सरपंच दीपक नाईक, ग्रामपंचायत सदस्य, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर होडावडेकर व ग्रामस्थांच्या मागणीला यश मिळाले आहे. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णवाहीका प्रदान केल्याने वेस्ट कोस्ट कंपनीचे मालक तरुण कुमार यांना सरपंच दीपक नाईक व मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. किनळे गावाला नेहमीच सहकार्य करणार असल्याची ग्वाही उद्योजक तरुण कुमार यांनी दिली.