महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपघातग्रस्तांच्या सेवेत रुग्णवाहिका

10:42 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य-पुंटुंब कल्याण खात्याला आधार

Advertisement

बेळगाव : अपघातग्रस्तांना तातडीने सेवा उपलब्ध व्हावी. यासाठी शासनाने रुग्णवाहिका देऊ केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते एकूण 65 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या ताफ्यातही रुग्णवाहिका दाखल होणार आहे. त्यामुळे तातडीने रुग्णांची वाहतूक होणार आहे. प्रवासादरम्यान रुग्णांना अधिक सुरक्षितता मिळावी. यासाठी अत्याधुनिक सुविधानियुक्त ही रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहे. विशेषत:अलीकडे वाहतुकीदरम्यान अपघात वाढू लागले आहेत. तातडीने उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहेत. अशा परिस्थितीत ही आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा देणार आहे.

Advertisement

अधिक सुरक्षित वाहतुकीवर भर देणार

कर्नाटक रस्ते सुरक्षा प्राधिकरणातर्फे अपघातावर नियंत्रण आणून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ही आपत्कालीन रुग्णवाहिका अधिक सुरक्षित वाहतुकीवर भर देणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article