For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीजचे केले अधिग्रहण

06:18 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीजचे केले अधिग्रहण
Advertisement

5,185 कोटींमध्ये करार संपन्न : अंबुजाचे समभाग 7 टक्क्यांनी वधारले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

अदानी समूहाची कंपनी अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. अंबुजा सिमेंटने संघी इंडस्ट्रीजला 5,185 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अदानी समूहाने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. या बातमीनंतर अंबुजा सिमेंटचे समभाग हे सुमारे 7 टक्क्यांनी वाढले. कंपनीचे समभाग हे 6.94 टक्क्यांच्या वाढीसह 507.50 रुपयांवर बंद झाले.

Advertisement

सांघी इंडस्ट्रीजमधील अंबुजा सिमेंट्सचा कंट्रोलिंग स्टेक 54.51 झाला. या अधिग्रहणानंतर, अंबुजा सिमेंटचा सांघी इंडस्ट्रीजमध्ये 54.51 टक्के कंट्रोलिंग स्टेक आहे. तसेच, या संपादनानंतर, अंबुजा सिमेंटची एकत्रित क्षमता 68.5 एमटीपीए  वरून 74.6 एमटीपीए झाली आहे. यामुळे अंबुजा सिमेंटच्या 2028 पूर्वी 140 एमटीपीए क्षमता गाठण्याच्या प्रवासाला गती मिळेल.

2.23 टक्के अतिरिक्त स्टेक खरेदी करण्यासाठी सुधारित ओपन

ऑफर एक्स्चेंज फाइलिंगनुसार, अंबुजा सिमेंट्सने सांघी इंडस्ट्रीजमधील अतिरिक्त 2.23 टक्के स्टेक विकत घेण्यासाठी ओपन ऑफर सुधारित करून प्रति शेअर 114.22 रुपये प्रति शेअर वरून 121.90 रुपये केली आहे. 3 ऑगस्ट रोजी अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीजमधील 56.74 टक्के स्टेक विकत घेण्याची घोषणा केली होती.

सांघी सिमेंटची ग्राइंडिंग क्षमता वार्षिक 6.1 दशलक्ष मेट्रिक टन आणि क्लिंकरची क्षमता 6.6 दशलक्ष मेट्रिक टन आहे. खाणींमधून क्लिंकर प्लांटपर्यंत चुनखडी वाहून नेण्यासाठी कंपनीने 3.2 किमीचा बंद बेल्ट कन्व्हेयर बसवला आहे.

कंपनीकडे 130 मेगावॅटचा कॅप्टिव्ह थर्मल पॉवर प्लांट, कॅप्टिव्ह माईन्स, वॉटर डी-सेलिनायझेशन सुविधा आणि कच्छ, गुजरातमध्ये एक बंदर आहे जे 1 एमटीपीए कार्गो हाताळते.

सांघी सिमेंट गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळमध्ये सामान्य पोर्टलँड सिमेंट, पोर्टलँड पोझोलाना सिमेंट आणि पोर्टलँड स्लॅग सिमेंटची विक्री करते आणि तिची बंदरे मध्य पूर्व, आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील देशांना निर्यात करतात.

Advertisement
Tags :

.