महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मी चंद्रदीप’ अशी भीष्मप्रतिज्ञा आंबेडकरवादी जनतेने करावी

04:01 PM Nov 13, 2024 IST | Radhika Patil
Ambedkarite people should take the Bhishma pledge, "I am Chandradeep"
Advertisement

प्रा. शहाजी कांबळे यांचे आवाहन : कळे येथे आंबेडकरवादी जनतेचा भव्य मेळावा
कोल्हापूर : 
करवीर विधानसभेची निवडणूक आंबेडकरवादी जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे. सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी कायमपणे धावून येणाऱ्या आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असण्राया चंद्रदीप नरके यांना विधानसभेत पाठविण्यासाठी ‘मी चंद्रदीप’ अशी भीष्मप्रतिज्ञा आंबेडकरवादी जनतेने करावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव प्रा.शहाजी कांबळे यांनी केले. कळे ( ता. पन्हाळा ) येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ आयोजित आंबेडकरवादी जनतेच्या भव्य मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून कांबळे बोलत होते.

Advertisement

रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी भारतीय संविधान कोणीही बदलू शकत नसल्याचे सांगितले.घटना बदलणार असे खोटे नरेटिव्ह पसरून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीयांची फसवणूक केली आणि मतासाठी फायदा घेतला.मात्र महायुतीने बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील स्मारकासाठी निधी दिला, बाबासाहेबांचे लंडनचे घर स्मारक म्हणून घेतले आहे.हे सरकार बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना आंबेडकरी जनतेने बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
आर.पी.आय. करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर यांनी बाबासाहेबांनी कष्टातून लिहिलेल्या संविधानाला कोणीही हात लावू शकत नसल्याचे सांगितले.

Advertisement

गोकुळचे संचालक अजित नरके यांनी दलित समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्राया चंद्रदीप नरके यांना विधानसभेत पाठवण्यासाठी आंबेडकरी जनतेने सज्ज राहावे असे आवाहन केले.

जि. प. माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल कांबळे यांनी आभार मानले. रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयसिंग जाधव, शिवसेना पन्हाळा प्रमुख अरुण पाटील, भाजपा अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष लालासो पोवार,पन्हाळा भाजपा सरचिटणीस प्रताप काळे, लोक जनशक्ती पार्टी महिला जिल्हाध्यक्षा प्रियांका कांबळे, पन्हाळा अध्यक्ष ज्योती जाधव, करवीर अध्यक्ष संगीता कांबळे, पन्हाळा तालुका संघटक भगवान कांबळे (पणुत्रेकर), जिल्हा कार्याध्यक्ष संदीप कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख अर्जुन कांबळे (पाडळी), जिल्हा कार्याध्यक्ष संदीप कांबळे (पडळ), हारपवडे ग्रा.पं. सदस्य विठ्ठल कांबळे, प्रकाश कांबळे (हरपवडे), बाजीराव पोवार (मरळी), परशुराम भोगावकर यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article