कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एशियन’च्या समभाग विक्रीतून अंबानींना 9 हजार कोटींचा लाभ

06:51 AM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या एशियन पेन्ट्सच्या कंपनीतील 85 लाख समभाग विकले आहेत. हे समभाग सतत विकले जात आहेत. सोमवारी ट्रेडिंग सत्रात रब्बती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे समभाग चर्चेत राहिले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने सोमवारी खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे एशियन पेंट्सचे 85 लाख शेअर्स 1,876 कोटी रुपयांना विकले. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी मुंबईस्थित एशियन पेंट्समध्ये 3.64 टक्के हिस्सा किंवा 3.50 कोटी इक्विटी समभागांच्या विक्रीनंतर काही दिवसांनी ही विक्री झाली.

Advertisement

तपशील काय?

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील ब्लॉक डील डेटानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या सहयोगी सिद्धांत कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड मार्फत 85 लाख समभागांची विक्री केली, जे एशियन पेंट्समधील 0.88 टक्के हिस्सा दर्शवते.  प्रति समभाग हे सरासरी 2,207 रुपयांच्या किमतीने विकले गेले, ज्यामुळे व्यवहाराचे मूल्य 1,875.95 कोटी रुपये झाले. दरम्यान, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (एमएफ) ने त्याच किमतीत हे समभाग खरेदी केले. या खरेदीमुळे, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एमएफचा एशियन पेंट्समधील हिस्सा 1.24 टक्क्यांवरून 2.12 टक्क्यांपर्यंत वाढला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article