Ambabai Temple Kolhapur: अंबाबाईचे उद्यापासून दोन दिवस दर्शन बंद कारण...
.... त्यामुळे भाविकांना दोन दिवस अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवार, 11 व मंगळवार, 12 ऑगस्टपर्यंत सुऊ राहणार आहे. अंबाबाईच्या गाभाऱ्याचा दरवाजा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे भाविकांना दोन दिवस अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी शनिवारी रात्री प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाईच्या मूर्तीची सुस्थिती पाहण्यासाठी त्यानुसार विभागाकडील तज्ज्ञांकडून १६ एप्रिल २०२४ मध्ये मूर्तीची पाहणी करुन संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या १२ जून रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना मूर्तीची नियमित पाहणी करून गरजेनुसार संवर्धन प्रक्रिया करण्याबाबतची सूचना करणारे पत्र देवस्थान समितीने पाठवले होते.
त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ कोल्हापुरात येत आहेत. बुधवारपासून घेता येणार दर्शन ११ व १२ ऑगस्ट रोजी अंबाबाई मूर्ती संबर्धन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. १२ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत अंबाबाईच्या गाभाऱ्याचा दरवाजा बंदच ठेवण्यात येणार आहे. बुधबार, १३ ऑगस्टच्या पहाटेपासून अंबाबाईच्या मूर्तचि पूर्ववत दर्शन भाविकांना घडेल, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
त्यांच्याकडून ११ व १२ ऑगस्ट रोजी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली जाणार आहे. मूर्तीबर संवर्धन प्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे. दोन दिवस सुरु राहणाऱ्या या प्रक्रियेमुळे भाविकांना अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. दोन दिवसांच्या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी मंदिरातील पितळी उंबरठ्याच्या बाहेरील जागेत अंबाबाईची उत्सवमूर्ती व श्रीकलश ठेवण्यात येणार आहे.