महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅमेझॉन लॉजिस्टिक नेटवर्क वाढविणार

06:47 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय माल विदेशात पोहचविणे होणार सोपे

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

भारतीय माल आता परदेशात सहज पोहोचणार आहे, कारण लवकरच ई कॉमर्स या क्षेत्रातील मुख्य कंपनी अॅमेझॉन आपला क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक कार्यक्रम ‘ग्लोबल सेलिंग सेलर एक्स्पोर्ट अॅण्ड डिलिव्हरी’ या अंतर्गत वाढविणार आहे. यामुळे आता भारतीय निर्यातदारांना विदेशात माल पाठविण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान कंपनीने एक्स्पोर्ट नेव्हिगेटर सादर करण्याची घोषणाही केली आहे.

हा एक वन स्टॉप डॅशबोर्ड आहे, जो विक्रेत्यांना विदेशात वस्तू पाठविण्यासाठी संबंधीत सर्व आवश्यक ती सुविधा पूर्ण करण्यास मदत करणार आहे. उपलब्ध निवेदनानुसार अॅमेझॉनने भारत ते अमेरिका, युके आणि जर्मनी या हवाई आणि सागरी मार्गांवर तीन नवीन वाहकांचा समावेश करण्यासाठी अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग सेंड या मुख्य लॉजिस्टिक कार्यक्रमाचा विस्तार करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

यासोबतच भारतीय निर्यातदारांसाठी परवडणारी आणि मोठ्या प्रमाणात जागा असणारी गोदाम सुविधा सक्षम करण्यासाठी सेंड आता अॅमेझॉन वारहाऊस अॅण्ड डिस्ट्रीब्युशन सह एकत्रित केले आहे. हे कमी किमतीचे बल्क वेअरहाऊसिंग सोल्यूशन आहे जे विक्रेत्यांना अधिक कार्यक्षम करणारे ठरणार आहे. अॅमेझॉनने सांगितले की, सेंडद्वारे भारतीय निर्यातदार विदेशात अॅमेझॉनच्या केंद्रावर आपला माल सहज पाठवू शकणार आहेत.

अॅमेझॉन इंडियाचे संचालक (ग्लोबल ट्रेड) भूपेन वाकणकर म्हणाले, ‘आम्ही भारतभरातील उद्योजकांसाठी ई-कॉमर्स निर्यात संधी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत. 2025 पर्यंत देशातून अमेरिकन 20 अब्ज  डॉलरची एकत्रित निर्यात सक्षम करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत.’

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article