डाटा केंद्रांसाठी आरएमझेड, कोल्ट डाटाची भागीदारी
नवी दिल्ली :
भारतात डाटा केंद्रांच्या क्षेत्रात योगदान देण्यासाठी आरएमझेड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स आणि कोल्ट डाटा सेंटर सर्व्हिसेस (कोल्ट डीसीएस)यांनी एकत्रित भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या उभयतांनी आगामी काळघ्त 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये भागीदारी अंतर्गत केली जाणार आहे.
आरएमझेडने म्हटले आहे की या गुंतवणुकीच्या अंतर्गत सर्वात आधी नवी मुंबई, कोईमतुर, चेन्नई येथील उपलब्ध असलेल्या साईटचा विकास गतीने केला जाणार आहे. यानंतर तिसऱ्या साईटचाही समावेश लवकरच केला जाणार असल्याचे म्हटले आहे. कोल्ट डीसीएस यांनी टाटा केंद्रांसाठी पुणे किंवा हैदराबाद या शहरांचा विचार केल्याचे समजते. याशिवाय देशातील संभाव्य शहरांचा शोध कंपनी डाटा केंद्रांसाठी करते आहे. संयुक्त भागीदारीतून बनणाऱ्या डाटा केंद्रांची एकंदर क्षमता हे 250 मेगावॅट इतकी असणार आहे.