Satara News : मरळी विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी ठरली कलाकारांची अप्रतिम रांगोळी
मरळी प्रदर्शनात बारकाईने रेखाटलेल्या रांगोळ्यांनी पाहुण्यांचे लक्ष वेधले
नवारस्ता : पाटण तालुक्यातील मरळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरले जात असताना प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच रेखाटलेली अप्रतिम रांगोळी सध्या विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी ठरली आहे.
पाटण तालुक्यातील कै. बत्सलादेवी देसाई हायस्कूल, मरळी येथे ५३ वे तालुकास्तरीय तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनात विज्ञानाबरोबर कलांचेही सुंदर दर्शन घडत असल्याचे दिसत आहे. पाटण येथील कलाशिक्षक अमर भागवत आणि त्यांच्या कलाकार विद्यार्थ्यांनी यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकौशल्याने यंदाच्या विज्ञान प्रदर्शनात अनोख्या रांगोळी कलाकृतींची निर्मिती केली आहे.
या प्रदर्शनात लोकनेते बाळासाहेब देसाई, शिक्षणमहर्षी प. पू. बापूजी साळुंखे तसेचभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांची अप्रतिम रांगोळी रेखाटण्यात आली आहे. त्यामध्ये अत्यंत बारकावा, चेहऱ्यावरील हुबेहूब हावभाव, सुक्ष्म रेषांची जुळवाजुळव, रंगसंगतीचा आकर्षक बापरव व्यक्तिरेखांतील अचूक भावभावना आणि जीवंतपणा देण्यात आला आहे.
सध्या या प्रदर्शनात शिक्षण क्षेत्रातील प्रमुख पाहुणे, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर मंडळी, बिद्यार्थी या सर्वांकडून या कलाकृतींचेभरभरून कौतुक होत असून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला कलात्मकतेची अनोखी जोड मिळाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले आहे. रांगोळी कलाकृती रेखाटन साठी बरिष्ठांनी मार्गदर्शन केले.
मरळी येथे आजपासून पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, पंचायत समिती पाटण आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मरळी येथील कै वत्सलादेवी देसाई हायस्कुल ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सौ दीपा बोरकर यांनी दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन ४ रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते तर नरेंद्र पाटील आणि स्वामी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्यासह जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, धनंजय चोपडे, अनिस नायकवडी, गटविकास अधिकारी सरिता पवार, स्वामी संस्थेचे माजी सहसचिव आर. के. भोसले, मरळीच्या सरपंच कांचन पाटील, प्राचार्य एस. एस. पवार, बी. पी. देसाई, एस. व्ही. संकपाळ, व्ही. डी. काळबागे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.