अत्यंत चकित करणारे ब्रिजचे इंजिनियरिंग
अन्य ब्रिजपेक्षा अत्यंत वेगळे
चीनच्या झेजियांग प्रांतातील ताइजहौमध्ये एक फूटब्रिज असून याचे इंजिनियरिंग अत्यंत चकित करणारे आहे. हा ब्रिज अन्य ब्रिजच्या तुलनेत खूपच वेगळा आहे. शेनक्सियानजू खोऱ्याला पार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ब्रिजसारखे डिझाइन यापूर्वी पाहिले नसेल.
रुयी फूटब्रिजचे इंजिनियरिंग अनेकार्थाने चकित करणारे आहे. याचे डिझाइन अन्य ब्रिजच्या तुलनेत खूपच वेगळे आहे. हे शेनक्सियानजू खोऱ्याच्या दोन पर्वतांदरम्यान 100 मीटर लांब आहे, हा ब्रिज दूरवरून पाहिल्यास एका विशाल नेत्राप्रमाणे दिसतो. याच्या चहुबाजूला अद्भूत नैसर्गिक सौंदर्य दिसून येते. हा ब्रिज जमिनीपासून 140 मीटरच्या उंचीवर तयार करण्यात आलेला आहे.
तीन पूलांना मिळून तयार या ब्रिजमध्ये थर्स्ट ब्रिज, सस्पेंशन ब्रिज आणि आर्च ब्रिज तिन्ही एकत्र दिसून येतात. ब्रिजचा तळ पारदर्शक काचेने तयार करण्यात आला असून यातून लोकांना खोऱ्यातील मोहक दृश्य पाहता येते. ब्रिजचे डिझाइन चिनी जेड रुयीवरून प्रेरित आहे, याला चीनमध्ये सुदैवाचे प्रतीक मानले जाते. ब्रिजचा आकार अनोखा असून तो एका हायपरबॉलिक शेपमध्ये आहे, याच्या मध्ये आकाशात विशाल नेत्राची आकृती दिसते, ब्रिजचे डिझाइन दिग्गज इंजिनियर हे युनचांग यांनी तयार केले आहे. युनचांग यांनीच बीजिंगमध्ये 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले स्टेडियम ‘बर्ड्स नेस्ट’च्या डिझाइनमध्ये मोठे योगदान दिले होते.
रुयी फूटब्रिज निर्मितीचे काम 2017 मध्ये सुरू करण्यात आले होते. सप्टेंबर 2020 मध्ये हा फूटब्रिज सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला होता. हा ब्रिज चीनमध्ये निमर्ति 100 हून अधिक काचेच्या पूलांपैकी एक असून तो स्वत:च्या डिझाइनप्रकरणी अद्वितीय आहे.