12 एप्रिलला झळकणार ‘अमर सिंह चमकीला’
भारतीय गायक आणि संगीतकार अमर सिंह चमकीला हे पंजाबी संगीतविश्वातील मोठे नाव होते. पंजाबचे सर्वाधिक विक्रमी रेकॉर्डची विक्री करणारे कलाकार हेते. 8 मार्च 1988 रोजी अमरसिंह चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत कौर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आता लवकरच त्यांची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाचा टीझर मागील वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. आता याच्या प्रदर्शनाची तारीख नेटफ्लिक्सने जाहीर केली आहे. ‘माहोल बन जाता था जब वो छेडता था साज, कुछ ऐसा ही था चमकीला का अंदाज’ अशी कॅप्शन देत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 12 एप्रिलपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. इम्तियाज अली यांचे दिग्दर्शन आणि ए.आर. रहमान यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्रा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.