अमन सेहरावत, सुजीतला सुवर्ण
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अमन सेहरारातने वीर सावरकर क्रीडा संकूलनात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भुवईच्या दुखापतीवर मात करत पुरुषांच्या फ्रीस्टाइल 61 किलो गटात सुवर्णपदक तर 65 किलो वजन गटात सुजितने सुवर्णपदके जिंकले.
या जोडीने आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड चाचण्यांमध्ये आपले स्थान निश्चित केले. 57 किलो वजनी गटात, 23 वर्षांखालील विश्वविजेता चिरागला 20 वर्षांखालील जागतिक पदक विजेत्या अंकुशकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अंकुशने सुवर्णपदक जिंकले, तर चिरागला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आरएसपीबीने 160 गुणांसह चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली, तर एसएससीबीने 155 गुणांसह उपविजेतेपद पटकावले. हरियाणाने 135 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. ग्रीको-रोमन स्पर्धा रविवारपासून सुरू होतील.
निकाल: 57 किलो : सुवर्ण-अंकुश (डिइएल); रौप्य-आतिश (आरएसपीबी); कांस्य-अक्षय (एमएएच) आणि चिराग (एचएआर) 61 किलो : सुवर्ण-अमन (आरएसपीबी); रौप्य-निखिल (डिइएल); कांस्य-दीपक (एसएससीबी) आणि अनुज (आरएजे) 65 किलो: सुवर्ण-सुजीत (एचएआर); रौप्य विशाल कालीरामन (आरएसपीबी); कांस्य रोहित (एसएससीबी) आणि विजय मलिक (सीएचडी) 70 किलो: सुवर्ण-अभिमन्यू (एचएआर); रौप्य-रवी (यूपी); कांस्य रोहन (आरएसपीबी) आणि रोहित (एमपी) 74 किलो: सुवर्ण-चंद्रमोहन (एसएससीबी); रौप्य-दीपक (एचएआर); कांस्य-विकास यादव (यूपी) आणि आदर्श (एमएएच) 79 किलो: सुवर्ण अमित (एसएससीबी); रौप्य मोहित (डीएल); कांस्य-सचिन मोर (आरएसपीबी) आणि राहुल (आरएजे),86 किलो: सुवर्ण मुकुल दहिया (एसएससीबी), रौप्य सचिन (एचएआर); कांस्य संदीप सिंग (पियूबी) आणि अमन सिंग (गुजरात) रौप्य, 92 किलो: सुवर्ण जॉइंटी दीपक (आरएसपीबी,सचिन (एचआर); कांस्य,साहिल जगलान (एसएससीबी) आणि रौप्य दीपक (आएजे);97 किलो: सुवर्ण विकी (आरएसपीबी); कांस्य-साहिल (पीयूबी) आणि वेताळ (एमएच) 125 किलो: सुवर्ण दिनेश (एसएससीबी); रौप्य -रोनक दहिया (डिइएल); कांस्य महेंद्र (आरएसपीबी) आणि राजू (सीएचडी).