महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सदैव चालू ठेवावी लागते कार

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चुकून बंद केल्यास वर्षभरानेच होणार स्टार्ट

Advertisement

रशियाच्या याकुत्स्क गावाला जगातील सर्वात थंड ठिकाण मानले जाते. या गावात लोकांची वस्ती असून येथील किमान तापमान उणे 83 अंश इतके नोंदविले गेले आहे. याकुत्स्क गाव हे सायबेरियन वाळवंटात असून या ठिकाणी दुपारी उणे 40 अंश तापमान असेल तर ते उष्ण मानले जाते अणि उणे 68 अंश तापमान सहन करण्याजोगे मानण्यात येते. येथे लोकांचे जीवन डीप फ्रीजरमध्ये राहण्यासारखे आहे. येथे राहणाऱ्या लोकांचे राहणीमान अत्यंत आव्हानात्मक आहे. याकुत्स्क हे गाव  मॉस्कोपासून 5 हजार किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण इतके थंड आहे की येथे वाहनांना सदैव ऑन ठेवले जाते. याकुत्स्क हे ओमाइकॉन भागात असून हिवाळ्यात येथील सरासरी तापमान उणे 50 अंशापर्यंत असते. या तापमानादरम्यान येथील वाहने कधीच बंद केली जात नाहीत. याचे कारण अत्यंत रंजक आहे. जर चुकून गाडी बंद केली तर ती पुन्हा सुरू करण्यासाठी उन्हाळ्यापर्यंतची प्रतीक्षा करावी लागते.

Advertisement

उन्हाळ्यात उणे 10 अंश

येथे उन्हाळ्यात तापमान उणे 5 ते 10 अंश सेल्सिअसदरम्यान राहते. जर तुम्ही पुरेशा कपड्यांशिवाय घराबाहेर पडला तर बर्फाप्रमाणे गोठून जाल. येथे सर्वात मोठी समस्या दिवसभर वाहणारे थंड वारे आणि क्षणात तापमान कमी होणे आहे. येथील रस्ते बहुतांश वेळ बर्फाने आच्छादिलेले असतात. अशा हवामनामुळे याकुत्स्कमध्ये राहणे सोपे नाही.

जीवन अवघड

याकुत्स्कमध्ये सामान्य जीवन जवळपास अशक्य आहे. येथील लोकांसाठी सर्वात मोठे आव्हान अन्न प्राप्त करणे आहे. आता काळासोबत त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, लोकांना आता पाकिटबंद खाद्यपदार्थ उपलब्ध होऊ लागले आहेत. थंडी कमी होताच लीना नदीच्या काठावर वसलेल्या या गावात माशांची विक्री सुरु होते. येथे मासे अधिक ताजे राहतात, कारण येथे सातत्याने बर्फवृष्टी होत असते. मासे हेच येथील लोकांचे मुख्य अन्न आहे.

घर उबदार ठेवणे मुख्य काम

रशियातील याकुत्स्क हे सुंदर ठिकाण आहे. येथील लोक सकाळी उठल्यावर सर्वप्रथम लाकडं गोळा करण्याचे काम करतात. मग लाकडांना पेटवून घरातील वातावरण उबदार केले जाते. तापमान शून्याखाली गेल्यावर घरांना उबदार ठेवण्यासोबत पिण्यायोग्य पाणी शोधणे तेथे सर्वात महत्त्वाचे काम आहे. लोक येथे अधिक कपडे परिधान करतात. तसेच लोकांना मोठमोठे बूट्स घालून रहावे लागते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article