अल्वाज-मुडबिद्री संघाकडे साधना क्रीडा केंद्र चषक
निमंत्रितांच्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धा, यंग बेंगळूर उपविजेता, बेंगळूर तृतिय तर शिमोगा चौथा शुभांगु, आयमान,स्वामी यांना वैयक्तिक विजेते
बेळगाव : वडगाव येथील जेल स्कूल मैदानावरती साधना क्रीडा केंद्र आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय मॅटवरील खो खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अल्वाज मुडबिद्री संघाने यंग बेंगळूर संघाचा अटितटीच्या लढतीत 6 गुणांनी पराभव करुन साधना केंद्र चषक पटकाविला. बेंगळूर पायोनियर तिसऱ्या क्रमांक तर शिमोगाने चौथा क्रमांक पटकाविला. जेल स्कूलच्या मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अल्वाज मंगळूर संघाने एफआरए शिमोगा संघाचा 14 गुणांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यंग पायोनियर बेंगळूर संघाने वायपीएससी बेंगळूर संघाचा 8 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामनाचे उद्घाटन विरेश पाटील, जयभारत फौंडेशनचे दयानंद कदम, आय. एस. नाईक व कल्लाप्पा तोपिनकट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघाच्याखेळाडूंची ओळख करुन अंतिम सामन्याला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या डावात दोन्ही संघांनी एकमेकांवर समान गुण मिळविले. दुसऱ्या डावात अल्वाजने आक्रमक खेळाचा पावित्रा घेत बेंगळूर संघावर 6 गुणांची आघाडी मिळविली. हीच आघाडी विजयास कारणीभूत ठरली.