For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्वाज-मुडबिद्री संघाकडे साधना क्रीडा केंद्र चषक

10:40 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
अल्वाज मुडबिद्री संघाकडे साधना क्रीडा केंद्र चषक
Advertisement

निमंत्रितांच्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धा, यंग बेंगळूर उपविजेता,  बेंगळूर तृतिय तर शिमोगा चौथा शुभांगु, आयमान,स्वामी यांना वैयक्तिक विजेते

Advertisement

बेळगाव : वडगाव येथील जेल स्कूल मैदानावरती साधना क्रीडा केंद्र आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय मॅटवरील खो खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अल्वाज मुडबिद्री संघाने यंग बेंगळूर संघाचा अटितटीच्या लढतीत 6 गुणांनी पराभव करुन साधना केंद्र चषक पटकाविला. बेंगळूर पायोनियर तिसऱ्या क्रमांक तर शिमोगाने चौथा क्रमांक पटकाविला. जेल स्कूलच्या मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अल्वाज मंगळूर संघाने एफआरए शिमोगा संघाचा 14 गुणांनी तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यंग पायोनियर बेंगळूर संघाने वायपीएससी बेंगळूर संघाचा 8 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामनाचे उद्घाटन विरेश पाटील, जयभारत फौंडेशनचे दयानंद कदम, आय. एस. नाईक व कल्लाप्पा तोपिनकट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघाच्याखेळाडूंची ओळख करुन अंतिम सामन्याला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या डावात दोन्ही संघांनी एकमेकांवर समान गुण मिळविले. दुसऱ्या डावात अल्वाजने आक्रमक खेळाचा पावित्रा घेत बेंगळूर संघावर 6 गुणांची आघाडी मिळविली. हीच आघाडी विजयास कारणीभूत ठरली.

बक्षीस वितरण अशोक आर्यर्नचे व्यवस्थापक विरेश पाटील, जय भारत फौंडेशनचे संचालक दयानंद कदम, आय. एस. नाईक, कल्लाप्पा तोपिनकट्टी, साधना केंद्राचे अध्यक्ष संजय बेळगावकर, सचिव सतीश बाचीकर, प्रकाश नंदिहळ्ळी आदीमान्यवरांच्या हस्ते अल्वाज संघाला 25 हजार रोख व आकर्षक चषक, उपविजेत्या पायोनियर बेंगळूर संघाला 15 हजार रोख व चषक, तिसऱ्या क्रमांक पटकविलेल्या वायपीएस बेंगळूर संघाला 10 हजार रोख व चषक व चौथा क्रमांक पटकाविल्या एफआरए शिमोगा संघाला 7 हजार रोख व चषक देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ट रनर म्हणून शुभांगु-पायोनियर बेंगळूर, उत्कृष्ट चेजर आयमान पाशा-बेंगळूर, अष्टपैलु खेळाडू-स्वामी-अल्वाज मुडबिद्री यांना वैयक्तिक बक्षीसे देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंचांची भूमिका कर्नाटक खो खो फेडरेशनच्या पंचांनी केले. यावेळी शिवानंद कोरे, उपाध्यक्ष अशोक हलगेकर, विवेक पाटील, पी. ओ. धामणेकर, अनिल कोरे, अरुण धामणेकर, उमेश पाटील, शेखर चोळाप्पाचे, सी. एम. गोरल, शैलेश बांदिवडेकर व प्रकाश देसाई आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.