सर्व विमानांमध्ये आता अल्टिमीटर बदलणार
विमानतळांजवळ 5 जी बेस स्टेशन स्थापन करण्यात येणार : डीजीसीएच्या सूचना
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) सर्व विमान कंपन्यांसाठी रेडिओ अल्टिमीटर (आरए) अनिवार्य बदलण्याच्या सूचना जारी करणार आहे. विविध सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील विमानतळांजवळ 5जी बेस स्टेशन उभारता यावेत यासाठी हे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये, दूरसंचार विभागाने प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्स- भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया- यांना सी-बँडमध्ये 5 जी बेस तैनात करण्याचे निर्देश दिले होते. भारतीय विमानतळांजवळील विशिष्ट भागात 3,300 एमएचझेड ते 3,670 एमएचझेड बँडचे रेडिओ तरंग क्षेत्र स्टेशन स्थापित करू नका. हे विशेष क्षेत्र धावपट्टीच्या दोन्ही बाजूंपासून 2,100 मीटर आणि धावपट्टीच्या मध्यापासून 910 मीटरच्या त्रिज्येमध्ये ठेवण्यात आले होते. 5जी रेडिओ लहरींमुळे विमानाच्या रेडिओ अल्टिमीटरच्या सिग्नलवर परिणाम होऊ नये म्हणून हे करण्यात आले आहे. रेडिओ अल्टिमीटर विमानांना सुरक्षितपणे उ•ाण करण्यास आणि उतरण्यास मदत करते. नोव्हेंबर 2022 मध्ये, डीओटीने आदेश दिला की वरील झोनच्या 540 मीटर त्रिज्येतील 5जी बेस स्टेशनला त्यांची शक्ती 3,300 ते 3,670 एमएचझेड बँडमध्ये 58 डेसिबल मिलीवॅट्स (डीबीएम) पर्यंत मर्यादित करावी लागेल. दूरसंचार विभागाने ऑपरेटरना सांगितले आहे की सर्व विमानांमधील रेडिओ अल्टिमीटर बदलेपर्यंत बंदी कायम राहील.