For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिक पदकविजेते नसले, तरी भारतीय संघ ताकदवान

06:19 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिक पदकविजेते नसले  तरी भारतीय संघ ताकदवान
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेते नेमबाज नसले, तरी यजमान भारत मोसमातील अखेरच्या विश्वचषक फायनलमध्ये जेव्हा भाग घेईल तेव्हा त्यांची ताकद काही राहणार नाही. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत रिदम संगवानच्या नेतृत्वाखालील 23 सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेते आपोआप या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. परंतु पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसाळे यांनी डॉ. करणी सिंग रेंज येथे होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

रिदमव्यतिरिक्त गणेमत सेखॉन (महिला स्कीट) आणि सोनम मस्कर (महिला 10 मीटर एअर रायफल) यासारख्या उगवत्या तारका स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवून पाहतील. जागतिक क्रमवारीतील स्थानाच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेत स्थान मिळविले आहे. भारतीय संघात पॅरिस ऑलिम्पिकमधील नऊ खेळाडूंचा समावेश आहे. यात अर्जुन बाबुता (पुऊषांची 10 मीटर एअर रायफल स्पर्धा), अनीश भानवाला (पुऊषांची 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धा) यांचा समावेश आहे.

Advertisement

रिदम महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 25 मीटर पिस्तूल या दोन्ही प्रकारात स्पर्धा करेल. संघातील इतर ऑलिम्पिकपटूंमध्ये मैराज अहमद खान (पुऊष स्कीट), दिव्यांश सिंह पनवार (पुऊषांची 10 मीटर एअर रायफल स्पर्धा) आणि चैन सिंग (पुऊषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन) यांचा समावेश आहे. अर्जुन सिंह चीमा (पुऊषांची 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा), विजयवीर सिद्धू (पुऊषांची 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धा), अनंतजित सिंह नाऊखा (पुऊषांची स्कीट स्पर्धा), माहेश्वरी चौहान (महिलांची स्कीट स्पर्धा), राजेश्वरी कुमारी (महिला स्कीट) आणि श्रेयसी सिंग (महिलांची ट्रॅप स्पर्धा) हे नेमबाज विश्वचषक फायनलमध्ये नेमबाजीसाठी सज्ज आहेत. या सर्व नेमबाजांनी पॅरिस गेम्समध्ये भाग घेतला होता.

मंगळवारपासून स्पर्धा सुरू होणार असून प्रथम महिला गटातील 10 मीटर एअर रायफल स्पर्धा होतील. त्यानंतर पुऊषांची स्पर्धा सुरू होईल. 10 मीटर एअर पिस्तूलमधील पुऊष आणि महिलांची फायनलही पहिल्या दिवशी होईल. 37 देशांतील 131 अव्वल नेमबाज यात सहभागी होणार असून त्यात अनेक ऑलिम्पिक विजेतेही आहेत.

Advertisement
Tags :

.