शाळांसोबत, आता आरबीआयला सुद्धा धमकीचे ईमेल
मुंबई
दिल्लीतील शाळा आणि संस्थांना बॉम्बच्या धमकीच्या ईमेलचे सत्र सुरुच आहे, तोवर आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला धमकीचा मेल आला आहे. या ईमेलमध्ये रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआयच्या अधिकाऱ्यांच्या मेल आयडीवर आलेला मेल हा रशियन भाषेतील असून मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी हा मेल पोलिस ठाण्यात पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच सध्या तपास सुरू आहे.
दिल्लीत ईमेल धमकीचे सत्र सुरुच आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये आरबीआय च्या कस्टमर केअर विभागालाही धमकीचा फोन आला होता. त्या फोन कॉलवरील व्यक्तीने तो लष्कर-ए-तैयबाचे सीईओ असल्याचेही सांगितले. तसेच फोन बंद करताना मागचा दरवाजा बंद करा, इलेक्ट्रीक कार खराब झाली आहे असे सांगितले.
त्यानंतर दिल्लीतील शाळांनाही धमकीचे ईमेल आले आहेत. त्याप्रकरणी सर्व तपास सूरू आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना घरीच ठेवा अथवा शाळेत असतील तर सुरक्षित ठेवले जात आहे असे, दिल्ली अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.