For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Almatti Dam: अलमट्टीचा विसर्ग एक लाखापर्यंत वाढवला, पाणीसाठा 3-4 टीएमसीने वाढला

11:59 AM Jul 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
almatti dam  अलमट्टीचा विसर्ग एक लाखापर्यंत वाढवला  पाणीसाठा 3 4 टीएमसीने वाढला
Advertisement

वारणा, कोयना, अलमट्टीचा पाणीसाठा दिवसात तीन ते चार टीएमसीने वाढला

Advertisement

सांगली : पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम असल्याने कोयना, वारणा, अलमट्टी धरणासह सर्वच धरणातील पाणीसाठा सरासरी तीन ते चार टीएमसीने वाढला आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातील विसर्ग सत्तर हजारावरून पुन्हा एक लाख क्युसेस करण्यात आला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील वारणा धरणात गुरूवारी २६.१३ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. आहे. तर घरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. वारणा, कोयना, अलमट्टीचा पाणीसाठा दिवसात तीन ते चार टीएमसीने वाढला.

Advertisement

पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात

टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे - कोयना ५८.८२ (१०५.२५), धोम ८.७२ (१३.५०), कन्डेर ७.१९ (१०.१०), धोम बलकवडी १.५३ (४.०८), उरमोडी ७.१९ (९.९७), तारळी ४.४७ (५.८५), वारणा २६.१३ (३४.४०), राधानगरी ५.७५ (८.३६), दूधगंगा १४.०१ (२५.४०), तुळशी २.३७ (३.४७), कासारी १.८८ (२.७७), पाटगांव ३.०२ (३.७२), अलमट्टी ८८.१२ (१२३).

विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेसमध्ये पुढीलप्रमाणे

कोयना धरणातून १०५०, कण्हेर १८४८, उरमोडी २१९१, वारणा १६४०, राधानगरी ३१००, दुधगंगा १६००, तुळशी ३००, कासारी ३००, हिप्परगी बॅरेज ९२७५० व अलमट्टी धरणातून १ लाख क्युसेस विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली १६.९ (४०) व अंकली पूल हरिपूर १९.७ (४५.११).

शिराळा तालुक्यात सर्वाधिक १६.७ मि.मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक १६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे. मि.मी. मध्ये...

मिरज १.६ (१२०), जत ०.१ (८९.३), खानापूर-विटा ०.४ (९४.९), वाळवा इस्लामपूर १ (२११.८), तासगाव ०.५ (११२.५), शिराळा १६.७ (५०३.८), आटपाडी ०.१ (८९.६), कवठेमहांकाळ ०.१ (९८.८), पलूस ०.८ (१७७.५), कडेगाव ०.८ (१४३.१)

Advertisement
Tags :

.