महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टॅक्सी व्यावसायिकांना स्वतंत्र अॅप सुरू करण्याची मुभा

01:00 PM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती : टॅक्सी चालकांना बॅच बंधनकारक

Advertisement

पणजी : गोवा माईल्स अॅप सेवेचे दर 20 टक्के कमी आहेत. संपूर्ण गोव्यात ही टॅक्सी अॅप सेवा सुरू आहे. ही अॅप सेवा स्व. मनोहर पर्रीकर यांनी राज्यात सुरू केली आहे. गोव्याच्या टॅक्सी व्यावसायिकांना गोवा माईल्स अॅपच्या सेवेत सहभागी होण्याची सक्ती नाही, तर टॅक्सी व्यावसायिकांनी आपले स्वतंत्र अॅप सुरू कण्याची मोकळीक आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत सांगितले.

Advertisement

राज्यात 18 हजार टॅक्सी वाहने असल्याचे गृहीत धरल्यास जास्तीत जास्त 10 हजार कोटींचा टॅक्सी व्यवसाय आहे. टॅक्सी व्यवसायात शिस्त येण्यासाठी अॅपची गरज आहे यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आमदारांची बैठका घेण्याची तयारी आहे. गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांसाठी टॅक्सी पात्रांव योजना सुरू केली आहे. याचे 90 टक्के लाभार्थी गोमंतकीय आहेत. टॅक्सी चालकांना बॅच बंधनकारक आहे, असे मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले.

कदंबा महामंडळाकडे 541 बसेस आहेत. ग्रामीण भागात 329, शहरी भागात 100 बसेस धावत आहेत. इलेक्ट्रिक बसेस 64 असून, त्यापैकी पणजी स्मार्ट सिटीकडे 48 बसेस आहेत. आणखी 86 बसेस येणार आहेत. तसेच सीएसआर अंतर्गत आयआयटी अॅल्युमिनीकडून 500 बसेस गोव्याला मिळणार आहेत.  सरकारकडून यापुढे रेन्ट-अ-कार आणि रेन्ट-अ-बाईक यांना परवाने दिले जाणार नाहीत, असे वाहतूकमंत्री या नात्याने गुदिन्हो यांनी सभागृहात सांगितले.

औद्योगिक धोरणाचा फज्जा; जमिनींचा गैरवापर : युरी आलेमाव यांची टीका

सरकारने राबविलेल्या औद्योगिक धोरणाचा सध्या फज्जा उडालेला आहे. कारण औद्योगिक धोरण व्यवस्थित राबवले जात नसल्याने जे प्लॉट देण्यात आले आहेत, त्यामध्ये गैरवापर झाला आहे. केवळ जमिनीवर डोळा ठेवून प्लॉटची विक्री करण्यात आलेली आहे. गेल्या 20 वर्षांत 40 प्लॉटवर कुठलेच बांधकाम झालेले नाही. नवीन फॅक्टरी आलेली नाही. मात्र, विक्री बिनदिक्कत सुरू आहे. सरकारने असे प्रकार रोखण्यासाठी कोणते उपाय योजले, अशी विचारणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभा सभागृहात केली.

युरी आलेमाव यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, 230 कोटी ऊपये काही कंपन्या सरकारला देणे लागत आहे. हे पैसे वसूल करण्यासाठी सरकारने आतापर्यंत का पावले उचलली नाहीत. राज्यातील महिला औद्योगिक क्षेत्रात किती प्रमाणात उतरल्या, त्याची आकडेवारी सरकारने विधानसभा सभागृहाच्या पटलावर ठेवावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली.

भरवशाची वाहतूक सेवा नाही म्हणून खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. 345 नव्या बसमार्गाची  मागणी झाली आहे पण पूर्ण झालेली नाही. रस्त्यावर सूचना फलक नाहीत. 184 बसगाड्या स्क्रॅप करण्यात आल्या. आता फक्त 200 बसगाड्या आहेत. नवे बसस्थानक कुठे येणार, जे आहेत ते मॉडर्न होणार आहेत का, नवे रस्ते खराब पद्धतीने बांधण्यात आले आहेत. टॅक्सी चालकांचा प्रश्न सोडवण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असे मुद्दे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत मांडले.

खासगी बस मालकांना डिझेल सबसिडी द्या : विजय सरदेसाई

ऑल इंडिया परमीट असणाऱ्यांना टॅक्सी वाहनांना काउंटर दिला जात नाही मग गोवा माईल्सला दाबोळी विमानतळावर काउंटर कसा काय दिला. हा तर स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांवर अन्याय आहे. रेंट अ कॅब ला स्पीड गव्हर्नंस बसवण्यात यावा. ज्यामुळे अपघात व इतर गोष्टींवर नियंत्रण राखता येईल. बसेसना जीपीएस व्यवस्था असावी. ज्यामुळे नेमकी बस कुठे पोहचली ते  प्रवाशांना समजेल. कर्नाटक राज्यात महिलांना मोफत बससेवा सेवा आहे, ही योजना गोव्यातही राबवावी, अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभा सभागृहात केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article