चिंचोली कारखान्याला परवानगी द्या
लिंगायत पंचमसालीची पत्रकार परिषदेत मागणी
बेळगाव : गुलबर्गा (ता. चिंचोली) येथील कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कारखान्याचे काम लांबणीवर पडले आहे. शेतकरी आणि कामगारांसाठी उपयुक्त असलेल्या कारखान्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी लिंगायत पंचमसालीचे जिल्हाध्यक्ष आर. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चिंचोली येथील कारखान्यात इथेनॉल उत्पादन केले जाणार आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कारखान्याला परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारकडूनच परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे कारखान्याचे काम लांबणीवर पडू लागले आहे. कारखान्याच्या कामाला चालना मिळत नसल्याने कामगार आणि शेतकऱ्यांसमोरही अडचणी वाढू लागल्या आहेत. मात्र सरकारकडून परवानगीसाठी चालढकल केली जात आहे. तातडीने या कारखान्याला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी युवा संघटना अध्यक्ष गुंडू पाटील, शिवानंद तबाके, राजू किवडसन्नावर, महांतेश वक्कुद उपस्थित होते.