महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपात्र ठरवलेल्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या

12:36 PM Nov 28, 2024 IST | Radhika Patil
Allow admission to LLB students who have been declared ineligible.
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 3 5 वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या हजेरीमुळे अपात्र करण्यात आले आहे. त्यांना पुढील वर्षालाही प्रवेश नाकारला आहे. तरी या विद्यार्थ्यांना त्वरीत प्रवेश द्यावा, या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने शहाजी लॉ कॉलेजसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

Advertisement

निवेदनात म्हंटले आहे, एटीकेटी, कॅरीऑनसारख्या विशेष उपाययोजना असतानाही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना परीक्षा देणे किंवा पुढील वर्गात प्रवेश देणे संदर्भात कोणतीच उपाययोजना केली नाही. विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाया जाणार आहेत. अपात्र सेमिस्टरचे सहा महिने उलटूनही विद्यार्थ्यांना अद्यापही पुढील सेमिस्टरला प्रवेश नाकारला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता कॉलेज प्रशासन आणि संबंधित विभागाने त्यांच्या अधिकारातून योग्य त्या उपाययोजना कराव्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रथमेश कांबळे, डॉ. उल्हास त्रिरत्ने, विजय कौशल, साक्षी पाटील, तृप्ती माने, स्नेहल लावंड, सुजाता पाटील, साहिल शिंदे, रेश्मा गायकवाड, किरण के. के, महेश बावडेकर आदी उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article