जिल्हापरिषदेकडील ११ कोटींच्या कामांचे वाटप
सांगली :
जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील मजूर सोसायटी आणि सुशिक्षित बेरोजगारांना १० कोटी ७९ लाख रुपयांच्या कामांचे वाटप ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी करण्यात आले. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना पाच कोटी ४५ लाखाची १०३ कामे तर मजूर सोसायट्यांना पाच कोटी ३४ लाखाची ७७ कामांचा समावेश आहे.
मिनी मंत्रालयातील वसंतदादा पाटील सभागृहात ई कामवाटप ऑनलाईन लॉटरीद्वारे पार पडले. समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, बांधकामचे कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे, जलसंधारण अधिकारी रावसाहेब सरक, सर्व शिक्षणचे प्रभारी कार्यकारी अभियंता उमेश पाटील उपस्थित होते.
काम वाटपामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यासाठी १०३ कामांसाठी १८२८ प्ररताव सादर केले होते. त्यापैकी ५ कोटी ४५ लाखाच्या ९७ कामांचे वाटप झाले. तसेच मजूर सहकारी संस्थांसाठी ८२ कामांसाठी ३५९ प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी ५ कोटी ३४ लाखाच्या ७७ कामांचे कामांचे वाटप झाले. यामध्ये ६ कामांना प्रतिसाद मिळाला नाही. तसेच मजूर संस्थांकडून ५ कामांना प्रतिसाद मिळाला नसल्याने ती कामे पुढे घेण्यात येणार आहेत. ज्यांना कामे मिळाली आहेत, त्यांनी ४ ऑगष्टपर्यंत अनामत रक्कम व करार तालुका मुख्यालयाकडे करावा, कामे मुदतीत पूर्ण करावीत, अन्यथा त्यांना पुढील प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येईल. असा इशारा कार्यकारी अभियंता उबाळे दिला.
- सुबे अभियंत्यांची तालुकानिहाय कामे
तालुका कामे खर्च
शिराळा ४ १५ लाख ४९ हजार ९९६
वाळवा १५ ८२ लाख ४६ हजार ९५९
तासगाव ९ ४६ लाख ४९ हजार ८२१
खानापूर ४ २१ लाख १५ हजार
आटपाडी १२ ५२ लाख ७३ हजार ८७४
कवठेमहांकाळ ६ २९ लाख १० हजार ७८९
मिरज ७ ३९ लाख ७४ हजार २७०
पलूस ८ ३७ लाख ३४ हजार ९९५
जत २३ १ कोटी ८८ लाख २१ हजार २३४
कडेगाव ८ ३२ लाख ८७ हजार ३६७
मुख्यालय 9 ६३ हजार ७४५