महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विरोधी पक्षांच्या आघाडीची शनिवारी बैठक

06:19 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ममता बॅनर्जी राहणार अनुपस्थित : 1 जून रोजी मतदान प्रक्रिया समाप्त होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या आघाडीचे वरिष्ठ नेते नवी दिल्लीत बैठक घेणार आहेत. 1 जून रोजी होणाऱ्या बैठकीत निवडणुकीतील कामगिरीचे आकलन आणि भविष्यासाठी रणनीति तयार करण्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून ही बैठक बोलाविण्यात आली आहे. ‘इंडिया’च्या या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाग घेण्यास असमर्थता दर्शविली आहे.

या बैठकीत मी सामील होऊ शकत नाही, कारण त्यादिवशी पश्चिम बंगालच्या 9 जागांवर मतदान होणार आहे. याचबरोबर पंजाब, बिहार आणि उत्तरप्रदेशातील काही मतदारसंघांमध्ये शनिवारी मतदान होणार आहे. एकीकडे चक्रीवादळ आणि दुसरीकडे निवडणूक आहे. चक्रीवादळ ग्रस्तांना मदत पोहोचविणे हीच सध्या माझी प्राथमिकता असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

समर्थन देणार असल्याचे वक्तव्य

ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रात सरकार स्थापन करण्यास विरोधी पक्षांच्या आघाडीला यश मिळाले तर बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. तृणमूल काँग्रेस केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला समर्थन देणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आमच्या माताभगिनींना कुठलीही समस्या होऊ नये आणि जे लोक 100 दिवसांच्या रोजगार योजनेत काम करतात, त्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलणार आहोत. तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या आघाडीचा हिस्सा असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.

बैठकीचा अजेंडा काय असणार?

बैठकीच्या अजेंड्यात 4 जून रोजी निवडणूक निकालांच्या घोषणेपूर्वी विरोधी पक्षांच्या रणनीतिवर चर्चा आणि 7 टप्प्यांमधील निवडणुकांमधील कामगिरीचे मूल्यांकनही सामील असेल. 28 पक्ष असलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास दर्शविला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला केंद्रात सत्तेवर परतण्यापासून रोखणे आणि स्वत:चे सरकार स्थापन करण्याचे विरोधी पक्षांच्या आघडीचे लक्ष्य आहे. या आघाडीच्या मागील बैठका पाटणा, बेंगळूर आणि मुंबई समवेत विविध शहरांमध्ये पार पडल्या होत्या. मागील बैठकांमध्ये अनेक प्रस्ताव मांडले गेले होते. यात लोकसभा निवडणूक सामूहिक स्वरुपात लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article