महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नीलेश काब्राल यांच्यावरील आरोप अनाठायी

12:13 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुडचडे भाजप मंडळाचा पत्रकार परिषदेत दावा, माफीची मागणी, आरोपांचा निषेध, सदैव आमदारांसोबत असल्याचे स्पष्ट

Advertisement

केपे : कुडचडेचे आमदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर नोकरभरतीसंबंधी एका दैनिकामधून जे अनाठायी व विनाकारण आरोप प्रसिद्ध झालेले आहेत ते त्यांनी 15 दिवसांच्या आंत सिद्ध करावेत, नाही तर जाहीर माफी मागावी. तसे केले नाही, तर मानहानीचा खटला दाखल करू तसेच हे दैनिक कुडचडे मतदारसंघात विकण्यास मज्जाव करू व त्याच्यावर बहिष्कार टाकू, असा इशारा कुडचडे भाजप मंडळाने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी मंडळ अध्यक्ष व नगरसेवक विश्वास सावंत देसाई, कुडचडे नगराध्यक्ष प्रदीप नाईक, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई, सरपंच कविता गावस देसाई, उपनगराध्यक्षा रुचा वस्त, नगरसेविका डॉ. जस्मिन ब्रागांझा, प्रमोद नाईक, टोनी कुतिन्हो, पंच प्रमोद गावस देसाई, दिप्ती नाईक, कायतान कार्वाल्हो, नवीन खांडेकर, राजेंद्र वस्त, आशिष करमली, अशोक नाईक व इतर हजर होते.

Advertisement

काब्राल यांच्यावर करण्यात आलेल्या सदर आरोपांचा आम्ही निषेध करतो. कुडचडे भाजप मंडळ एकसंध असून सदैव आमदारांसोबत आहे. काब्राल हे तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले असून अनेक कामे त्यांनी केली आहेत, असे विश्वास सावंत देसाई यांनी सांगितले. तसेच त्याच दैनिकामधून माझ्या नावाने जी बातमी प्रसिद्ध झाली आहे तिही अत्यंत चुकीची व कार्यकर्त्यांची दिशाभूल करणारी आहे. कारण मी गेल्या अनेक वर्षांपासून भाजप कार्यकर्ता राहिलेलो आहे मात्र तिथे आरजी कार्यकर्ता म्हणून माझे नाव पुढे आणून चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे, असा दावा त्यांनी केला. यासंबंधीही सदर दैनिकाने माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. सोशल मीडियावर जे चालू आहे ती फक्त अफवा असून आम्हाला मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे, असे सावंत देसाई याप्रसंगी म्हणाले.

सरकार व भाजपवर आमचा पूर्ण विश्वास आहे. काब्राल हे या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले असून अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्याविषयी अफवा पसरवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा सिद्धार्थ गावस देसाई यांनी केला. यावेळी मंडळ सदस्यांबरोबर विविध पंचायतींचे सरपंच, पंच, नगरसेवक व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते. या पत्रकार परिषदेत काब्राल यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार ही फक्त अफवा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पत्रकार परिषद चालू असतानाच काब्राल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची वार्ता सोशल मीडियावरून कळताच अनेक जण निराश झाल्याचे दिसले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article