महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अदानींवरील आरोपांचे संसदेत उमटणार पडसाद

06:45 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजपासून हिवाळी अधिवेशन : सर्वपक्षीय बैठकीत सभागृह सुरळीत चालू देण्याचे सरकारचे विरोधी पक्षांना आवाहन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

18 व्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार, 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, रविवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी 30 पक्षांचे एकूण 42 नेते उपस्थित होते. लोकसभेत पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधकांनी अदानींवरील आरोपांच्या प्रकरणावर चर्चेची मागणी केली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क फेडरल न्यायालयाने गौतम अदानी यांच्यावर सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 2,200 कोटी ऊपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी याप्रकरणी जेपीसीची मागणी केली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या चार आठवड्यांच्या कालावधीत अधिकाधिक वेळ सत्कारणी लावण्याचे आवाहन सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. विविध मुद्यांवर चर्चा करण्यासोबतच अधिकाधिक विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सरकार आग्रही आहे. याचदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांकडून मणिपूरमधील हिंसाचार, अदानींवरील आरोप, दिल्लीतील प्रदूषण असे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी रविवारी आपल्या पक्षाने मणिपूरचा मुद्दा, प्रदूषण आणि रेल्वे अपघातांवर संसदेत चर्चा करण्याचाही प्रस्ताव दिल्याचे सांगितले. तथापि, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी योग्य वेळी या मुद्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच विरोधकांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 19 बैठका होणार आहेत. सरकारने वक्फ दुऊस्ती विधेयकासह 16 विधेयकांची यादी तयार केली आहे. लोकसभेच्या बुलेटिननुसार लोकसभेत 8 आणि राज्यसभेत 2 विधेयके प्रलंबित आहेत. त्याशिवाय 5 विधेयके मांडण्यासाठी आणि पारित करण्यासाठी सूचीबद्ध करण्यात आली आहेत. तर अन्य 11 विधेयके विचारार्थ आणि पारित करण्यासाठी आहेत. ‘वन नेशन वन इलेक्शन’संबंधी विधेयकाचा समावेश या यादीत नाही. मात्र, सरकार आगामी अधिवेशनात यासंबंधी प्रस्तावित कायदा आणू शकते.

नवनिर्वाचित खासदारांना शपथ

या अधिवेशनात कामकाज सुरू होण्यापूर्वी केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या दोन नवीन खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला शपथ देतील. वायनाडमधील विक्रमी विजयानंतर प्रियांका गांधी प्रथमच लोकसभेत एन्ट्री करणार आहेत.

संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात एक विशेष कार्यक्रम साजरा केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दोन्ही सभागृहातील सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

वक्फ विधेयकावरील अहवालाची प्रतीक्षा

वक्फ दुऊस्ती विधेयकावरील संयुक्त समितीने 29 नोव्हेंबर रोजी संसदेत अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, विरोधी सदस्यांनी समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. 22 ऑगस्टपासून जेपीसीच्या 25 बैठका झाल्या आहेत. 6 मंत्रालये, 8 वक्फ बोर्ड आणि 4 अल्पसंख्याक आयोगांसह 123 भागधारकांकडून सूचना घेण्यात आल्या आहेत. वक्फ मालमत्तांचे नियमन करण्यासाठी वक्फ कायदा 1995 लागू करण्यात आला. मात्र त्यात भ्रष्टाचार आणि अतिक्रमणाचे आरोप प्रदीर्घ काळापासून होत आहेत. वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 चे उद्दिष्ट त्यात सर्वसमावेशक सुधारणा करणे हा आहे. त्यानुसार डिजिटलायझेशन, ऑडिट, पारदर्शकता आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या मालमत्ता परत घेण्यासाठी कायदेशीर यंत्रणा सुरू करणे आदींबाबत विचार होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article