महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’चा आरोप

06:38 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री एन. एस. बोसराजू यांच्याकडून गौप्यस्फोट : काँग्रेसच्या 9 आमदारांशी भाजपने संपर्क साधल्याचा आरोप

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) भूखंड वाटप प्रकरणावरून भाजपने सत्ताधारी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी भाजपवर विविध आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मंड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रविकुमार गणिग यांनी भाजपकडून काँग्रेस आमदारांना 100 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला होता. आता मंत्री एन. एस. बोसराजू यांनी भाजपकडून ‘ऑपरेशन कमळ’चे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

हुबळी येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री एन. एस. बोसराजू यांनी भाजप नेत्यांनी आमच्या पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधल्यानंतर 24 तासांच्या आत मला माहिती उपलब्ध झाली. उत्तर कर्नाटकासह काही जणांनी संपर्क साधला होता. तेव्हा ऑपरेशन कमळचा पहिला प्रयोग उघड झाला. आमच्या पक्षातील 9 जणांशी संपर्क साधण्यात आला आहे. आमच्या आमदारांना 100 कोटी किंवा 50 कोटींचे आमिष असू शकते. मात्र, ऑफर देण्यात आली ही बाब सत्य आहे, असा गौप्यस्फोट केला.

केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राज्य सरकारविरुद्ध षड्यंत्र रचले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संनगमत करून या नेत्यांनी सहा महिन्यात राज्यातील सरकार पाडू, असा शब्द दिला आहे. त्यांच्या शब्दाचे भाजप नेते पालन करत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी होत असल्याने मुडा गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे, असा आरोपही बोसराजू यांनी केला.

राजभवन भाजप-निजदचे कार्यालय

काही झाले तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार हिरावून घेणे शक्य नाही. ईडी, सीबीआय यासह सर्व प्रयोग झाले. अखेर मुडा प्रकरण बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांनी खोदलेल्या ख•dयात तेच कोसळतील. राजभवन कार्यालय हे आता भाजप-निजदचे कार्यालय बनले आहे. काही झाले तरी सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांना धक्का देणे भाजपला शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले.

पुन्हा राजकीय गोटात उलटसुलट चर्चा

26 ऑगस्ट रोजी मंड्याचे आमदार रविकुमार गणिग यांनी भाजप-निजद नेत्यांकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन कमळसाठी भाजपच्या  काही नेत्यांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांशी संपर्क साधला असून 50 ते 100 कोटींचे आमिष दाखविले आहे, असा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. आता मंत्री एन. एस. बोसराजू यांनी गौप्यस्फोट केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय गोटात उलटसुलट चर्चेला उत आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article